Top Newsस्पोर्ट्स

वेस्ट इंडिजविरुद्ध मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्मा कर्णधार, जसप्रीत बुमराह, शमीला विश्रांती

मुंबई : वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० आणि एकदिवसीय मालिकेसाठी रात्री उशिरा टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. दुखापतीतून सावरत संघात पुनरागमन केलेल्या रोहित शर्माकडे दोन्ही संघांचं नेतृत्व सोपवण्यात आलं आहे. विराट कोहली दोन्ही मालिकांमध्ये खेळणार आहे. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमीला या मालिकांमधून आराम देण्यात आला आहे. आर. अश्विनला मात्र संघात स्थान देण्यात आलेलं नाही.

या मालिकेतून भुवनेश्वर कुमाराला डच्चू देण्यात आला असून लेग स्पिनर रवि बिश्नोई, दीपक हुड्डाला पहिल्यांदाच संघात घेण्यात आली आहे. टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज दरम्यान ३ वनडे आणि ३ टी-२० सामन्यांची मालिका होणार आहे. ही मालिका ६ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. वनडे सामने अहमदाबादेत खेळवले जाणार आहेत, तर टी-२० मालिका कोलकातामध्ये होणार आहे.

सर्वात मोठी गोष्ट म्हणजे टीम इंडियात कुलदीप यादवचंही पुनरागमन झालं आहे. कुलदीप यादवला वनडे संघात घेतलं आहे. हुड्डाला केवळ वनडे मालिकेत घेण्यात आलं आहे.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील खराब कामगिरीमुळे भुवनेश्वर कुमाराला संघातून डच्चू देण्यात आला होता. परंतु, टी-२० मध्ये त्याचा समावेश करण्यात आला आहे. व्यंकटेश अय्यरलाही एक दिवसीय संघातून बाहेर ठेवण्यात आलं आहे. तर शिखर धवनला टी-२० तर इशान किशनला वनडेतून डच्चू देण्यात आला आहे. केएल राहुलही पहिल्या वनडेत खेळणार नाहीत. रवींद्र जडेजा अजून बरा झालेला नाही. त्यामुळे त्याची संघात निवड करण्यात आलेली नाही.

गेल्या काही वर्षापासून कुलदीप यादवला त्याच्या व्यक्तिगत आयुष्यात अनेक चढ-उतार पाहावे लागले होते. अनेकदा त्याला संघातून बाहेर राहावे लागले आहे. गेल्यावर्षी श्रीलंका दौऱ्यावर भारतीय संघाच्या बी टीममध्ये त्याला संधी देण्यात आली होती. मात्र, दक्षिण आफ्रिकेच्या सीरिजमध्ये कुलदीपला स्थान मिळाले नव्हते. एवढेच नव्हे तर आयपीएलमध्येही केकेआरने कुलदीपला प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर ठेवले होते. जखमी झाल्याने त्याला संघाबाहेर राहावे लागले होते. मात्र, यावेळी त्याला संधी देण्यात आली आहे. कुलदीप यादवचा वनडे आणि टी-२० रेकॉर्ड अत्यंत चांगला आहे. कुलदीपने ६५ वनडे सामन्यात १०७ बळी घेतले होते. टी-२० मध्येही त्याने २३ सामन्यात ४१ बळी घेतले होते.

२१ वर्षीय लेग स्पिनर रवि बिश्नोईला पहिल्यांदाच टीम इंडियात संधी देण्यात आली आहे. बिश्नोईने आतापर्यंत १७ प्रथम श्रेणी सामन्यात २४ बळी घेतले आहेत. लखनऊन सुपर जायंट्सने त्याला आपल्या संघात स्थान दिलं होतं. बिश्नोईने २३ आयपीएल मॅचेसमध्ये २४ बळी घेतले आहेत.

वनडे संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शिखर धवन, ऋतुराज गायकवाड़, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, ऋषभ पंत, दीपक चाहर, शार्दुल ठाकुर, रवि बिश्नोई, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंगटन सुंदर, मोहम्मद सीराज, आवेश खान आणि प्रसिद्ध कृष्णा.

टी-२०संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, वेंकटेश अय्यर, दीपक चाहर, शार्दुल ठाकुर, रवि बिश्नोई, अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, वॉशिंगटन सुंदर, मोहम्मद सीराज, भुवनेश्वर कुमार, आवेश खान और हर्षल पटेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button