आरोग्य

टाटा मोटर्सने सुरू केला ‘व्हील्स ऑफ लव्ह’ हा पालकत्वाला पाठबळ देणारा सर्वांगीण कार्यक्रम

मुंबई : टाटा मोटर्सने ‘व्हील्स ऑफ लव्ह’ या सर्वांगीण कार्यक्रमाची घोषणा केली. नव्याने मातापिता झालेल्यांना त्यांच्या या रोमांचक प्रवासात एक पालक म्हणून तसेच कंपनीचे अमूल्य कर्मचारी म्हणून मदत करण्याच्या तसेच कंपनीत विविध स्तरांवर काळजी, समावेशकता आणि संवेदनीकरणाची प्रगतीशील संस्कृती करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे.

नव्याने पालक झालेल्यांना किंवा होणार असलेल्यांना त्यांच्या वाढत्या कुटुंबावर लक्ष केंद्रित करणे आणि त्याचवेळी करिअरमधील उद्दिष्टेही पूर्ण करणे या दोन्ही आघाड्या यशस्वीरित्या सांभाळण्याची गरज भासते. यासाठी त्यांना उपयुक्त ठरतील अशी अनेक तत्त्वे मांडणारे ‘व्हील्स ऑफ लव्ह’ याच नावाचे पुस्तकही तयार करण्यात आले आहे. पालकांना मार्गदर्शन करण्यासोबतच, व्यवस्थापकांनी पालकत्वाच्या विविध टप्प्यांमधून जाणाऱ्या त्यांच्या टीममधील सदस्यांना कशी मदत करावी याबद्दलही महत्त्वपूर्ण माहिती या पुस्तकात देण्यात आली आहे.

टाटा मोटर्सचे प्रमुख मनुष्यबळ विकास अधिकारी रवींद्र कुमार जी. पी. ‘व्हील्स ऑफ लव्ह’ची घोषणा करताना म्हणाले, “टाटा मोटर्समध्ये आम्ही यशाकडे नेणारे धोरण म्हणून प्रत्येक स्तरावर वैविध्य आणि समावेशकतेचा स्वीकार केला आहे. स्त्री-पुरुष सर्वांना सामावून घेणारे (जेंडर डायव्हर्स) कार्यस्थळ विकसित करण्यासाठी आम्ही अनेक वर्षांपासून प्रयत्नशील आहोत. हे कार्यस्थळ संवेदनशीलही आहे आणि समावेशकही आहे. आपल्या आयुष्याच्या आणि करिअरच्या विविध टप्प्यांमध्ये असलेल्या महिला कर्मचाऱ्यांसाठी आकर्षक व सहाय्यकारी असेल अशी परिसंस्था निर्माण करण्याच्या पायावर ही संस्कृती आधारलेली आहे. ‘व्हील्स ऑफ लव्ह’ हा कार्यक्रम हाच विचार पुढे घेऊन जात नवीन तसेच होऊ घातलेल्या पालकांसाठी नातेसंबंध, प्रेम आणि मदतीचे एकात्मिक नेटवर्क तयार करणार आहे, जेणेकरून पालकत्वाच्या वरदानाचा आनंद त्यांना घेता येईल.”

या कार्यक्रमात समाविष्ट असलेल्या प्रमुख अंगांपैकी काही पुढीलप्रमाणे:
कामाच्या ठिकाणी गरोदरपणाची माहिती देणे, व्यवस्थापकांपुढील पेच समजून घेणे, वर्क डिलिव्हरेबल्सचे (जे काम करून देणे अपेक्षित आहे ते) प्रभावी व्यवस्थापन, कामाचे हस्तांतर, मातृत्व रजेचे व्यवस्थापन आणि कामावर पुन्हा रुजू होतानाचे स्थित्यंतर
मातृत्वाच्या विविध टप्प्यांतून वाट काढण्यात मदत करण्यासाठी मदर अँड मॅनेजर गाइड्स, पालक होणे आणि कामावर परतण्यातील स्थित्यंतर
नवीन पालकांना जाणवणाऱ्या भावनिक व मानसिक आव्हानांचा सामना करण्यासाठी डेडिकेटेड समुपदेशन सत्रे
गरोदर स्त्रिया/नवमाता आणि त्यांच्या व्यवस्थापकांसाठी कामातील स्थित्यंतरांचे व्यवस्थापन करण्यासाठी वन-टू-वन कोचिंग सत्रे
नवमातांना त्यांच्या बाळंतपणाच्या रजेदरम्यान कामाच्या ठिकाणाशी संपर्क कायम ठेवण्यासाठी एक बडी नियुक्ती करून देणे
एम्प्लॉयी रिसोर्स ग्रुप्स हा नवीन पालकांसाठी एक विशेष समुदाय आहे, यामध्ये आपण काय शिकलो ते, आपले अनुभव यांचे आदानप्रदान करता येईल
नवजातांसाठी करावयाची तयारी, दोन्ही पालक काम करत असतील अशा परिस्थितीत बाळाची काळजी घेण्यातील जबाबदारी आणि बऱ्याच विषयांवर मार्गदर्शन करणारे वेबिनार्स
आपल्या मनुष्यबळाची सामूहिक शक्ती उपयोगात आणण्यासाठी टाटा मोटर्स वैविध्य व समावेशन यांना प्राधान्य देत राहील आणि त्यायोगे समुदायामध्ये सुधारणा करण्यासाठी तसेच राष्ट्राच्या एकंदर वाढीत योगदान देण्यासाठी नवोन्मेषकारी व्यवसाय सोल्यूशन्स निर्माण करेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button