राज्यात उद्यापासून काय सुरु, काय बंद?
मुंबई : राज्यात उद्या (सोमवार) पासून कडक निर्बंध (Strict Restrictions) लावण्यात येणार आहेत. तसेच शुक्रवारी रात्री 8 ते सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत कडक लॉकडाऊन करण्य़ात येणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली आज महाराष्ट्रातील मिनी लॉकडाऊनबाबत घोषणा करण्यात आली. यामध्ये आठवड्याचे पाच दिवस कडक निर्बंध आणि शनिवार-रविवार कडक लॉकडाऊन करण्यात येण्याबाबत निर्णय घेण्यात आला. उद्या रात्री ८ वाजल्यापासून नियमावली लागू होईल. उद्योग व्यवसायांना कंपनीच्या वेळा ठरविण्यात येणार आहेत. सिनेमागृहे, नाट्यगृह बंद राहणार आहेत. कंपन्यांमध्ये कोरोना रुग्ण सापडला तर त्याची जबाबदारी कंपनी मालकाची असेल, असे मुंबईच्या पालकमंत्र्यांनी सांगितले. रात्रीच्या वेळी अत्यावश्यक सेवांनाच संचार करण्यास मुभा देण्यात येणार आहे.
कालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यातील प्रसारमाध्यमांच्या संपादकांशी बोलताना आता लॉकडाऊन करण्याची वेळ आल्याचे सांगितले होते. हळूहळू निर्बंध लादून लोक ऐकत नाहीत. यामुळे आधी संपूर्ण लॉकडाऊन आणि नंतर हळूहळू सूट देण्याची योजना असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यासह मुख्यमंत्र्यांनी संकेत दिले होते. राज्यासह मुंबईत बस, लोकल सेवा आसन क्षमतेनुसार सुरु ठेवण्यात येणार आहेत.
काय सुरु, काय बंद?
– शुक्रवार रात्री 8 ते सोमवार सकाळी 7 पर्यंत कडक लॉकडाऊन
– लोकल ट्रेन सुरू राहणार
– जिम बंद होणार
– अत्यावश्यक सेवांना परवानगी
– रेस्टॉरंट, मॉल टेक अवे सर्व्हिस सुरु राहणार
– अत्यावश्यक सेवेतील लोकांनाच गाडी चालण्याची परवानगी
– रात्री केवळ अत्यावश्यक सेवा सुरु राहतील
– धार्मिक स्थळांवर निर्बंध असतील
– सिनेमागृह, नाट्यगृह संपूर्णत: बंद
– गार्डन, मैदाने बंद
– जिथे केसेस वाढतायेत तेथील निर्णय घेण्याचा अधिकार स्थानिक प्रशासनाला
– सिनेमा, मालिकांचे शुटींग मोठ्या संख्येनं करता येणार नाही
– रिक्षा- ड्रायव्हर + 2 लोक
– बसमध्ये केवळ बसून प्रवास करता येईल
– टॅक्सीत मास्क घालावा
– कार्यालयांना वर्क फ्रॉम होम सुरू करण्याच्या सूचना
– इंडस्ट्री चालू राहणार, कामगारांवर कुठलेही निर्बंध नाहीत
– बांधकाम चालू, सरकारी ठेके असलेली कामं सुरु राहणार
– मंत्रालय, महत्वाचे ठिकाणी व्हिजिटर्स बंदी
– चित्रपट शूटिंगला परवानगी आहे, पण गर्दी करू नये, लढाई, आंदोलन असे सीन असतील त्या शूटिंगला बंदी
– बाजारपेठांमध्ये मर्यादित संख्येनं सोडलं जाईल
सार्वजनिक वाहतूक सुरु राहणार
रिक्षा, टॅक्सी, बस, ट्रेन, खाजगी वाहतूक अशी सर्व प्रकारची परिवहन सेवा सुरु राहील. मात्र निम्म्या क्षमतेने सार्वजनिक वाहतूक सुरु राहणार असल्याची माहिती अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.