Top Newsराजकारण

वाशिममध्ये किरीट सोमय्यांच्या ताफ्यावर दगडफेक

वाशिम : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आली आहे. शिवसैनिकांनी ही दगडफेक केल्याचं सांगण्यात येत आहे. सोमय्यांच्या ताफ्यावर दगडफेक आणि शाईफेक करण्यात आली. सोमय्या वाशिम दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांच्या गाडीवर दगडफेक झाली आहे.

शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या बालाजी पार्टीकल बोर्ड कारखान्यावर १०० कोटींच्या घोटाळ्याचे आरोप केले होते. आज किरीट सोमय्या वाशिम दौऱ्यावर असताना बालाजी पार्टीकल बोर्ड कारखान्याची पाहणी करण्याकरिता या ठिकाणी ते येणार होते. मात्र भावना गवळी यांच्या समर्थकांनी किरीट सोमय्या यांच्या गाडीला काळे झेंडे दाखवत त्यांच्या ताफ्यावर दगडफेक केली. दगडफेकीनंतर किरीट सोमय्या घटनास्थळी न थांबताच निघून गेले आहेत. त्याठिकाणी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. सोमय्यांच्या गाडीवर दगडफेक झाल्याने जमावाने मोठी गर्दी केली होती. मात्र पोलिसांना ही गर्दी पांगवण्यासाठी तसंच परिस्थती नियंत्रणात आणण्याकरिता लाठीचार्ज करावा लागला.

वाशिमच्या शिवसेना खासदार भावना गवळी यांच्यावर भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी १०० कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. बालाजी पार्टीकल बोर्ड कारखान्यामध्ये खासदार भावना गवळी यांनी १०० कोटी रुपयांचा घोटाळा केला, असा आरोप सोमय्या यांनी केला होता. सोमय्या आज वाशिम दौऱ्यावर आले असता भडकलेल्या भावना गवळींच्या समर्थकांनी सोमय्या यांच्या गाडीवर दगडफेक आणि शाईफेक केली. यावेळी सोमय्य्या यांच्यासोबत भाजप आमदार राजेंद्र पाटणी होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button