
मुंबई : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात बंड पुकारलेल्या करुणा शर्मा यांना जातीवाचक शिवीगाळ करणे आणि गाडीत पिस्तूल आढळल्याप्रकरणी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. भाजप करुणा शर्मा यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरला आहे. दरम्यान, माजी मंत्री भाजप नेत्या पंकडा मुंडे यांनी एक ट्विट केलं आहे.
या ट्विटची जोरदार चर्चा सुरु आहे. यामध्ये त्यांनी ‘परळी सुन्न आहे. राज्याची मान खाली गेली आहे,’ असं म्हटलं आहे. . करुणा शर्मा यांच्यावरील पोलीस कारवाईच्या पार्श्वभूमीवर त्यांनी केलेल्या या ट्वीटचा रोख सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडंच असल्याचं बोललं जात आहे.
अन्याय चुकीच्या लोकांच्यात ताकत असल्यामुळे होतो असे नाही पराक्रमी हात बांधून बसतात म्हणुन होतो.शासन,प्रशासन,न्यायव्यवस्था कोणी आपल्या दारात नाही बांधू शकत हा विश्वास हरवू नये,wrong president should not be set!ही काळाची गरज आहे,परळी सुन्न आहे मान खाली गेली आहे राज्याची !!
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) September 7, 2021
“अन्याय चुकीच्या लोकांच्यात ताकत असल्यामुळे होतो असे नाही पराक्रमी हात बांधून बसतात म्हणुन होतो. शासन, प्रशासन, न्यायव्यवस्था कोणी आपल्या दारात नाही बांधू शकत हा विश्वास हरवू नये, wrong president should not be set! ही काळाची गरज आहे, परळी सुन्न आहे मान खाली गेली आहे राज्याची,” असं ट्विट पंकजा मुंडे यांनी केलं आहे.
करुणा शर्मा यांच्या समर्थनात आता भाजप मैदानात उतरणार आहे. भाजपचे बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्के यांनी ही घोषणा केली आहे. करुणा शर्मा यांच्यावर अन्याय झाला आहे. त्यांच्यावर गुन्हे दाखल करणं चुकीचं आहे. त्यांच्या गाडीत पिस्तूल टाकण्यात आलं आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी आक्रमक मागणी भाजपकडून करण्यात आली आहे.




