अनंत गीतेंचे वक्तव्य सत्य परिस्थितीवर आधारित : फडणवीस
मुंबई : माजी केंद्रीय मंत्री आणि शिवसेना नेते अनंत गीते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर शेलक्या शब्दात टीका केली. त्यांच्या टीकेला राष्ट्रवादीकडून प्रत्युत्तर देण्यात येत आहे. पण, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून समर्थन केलं जात आहे. अनंत गीतेंनी केलेलं वक्तव्य सत्य परिस्थितीवर आधारित आहे. अशी अनैसर्गिक आघाडी कधी चालू शकत नाही. मी तर पहिल्यापासून सांगतोय, ही अनैसर्गिक युती आहे, यांचं सरकार नीटपणे चालू शकत नाही, असं फडणवीस म्हणाले.
दोन काँग्रेस एका विचाराची होऊ शकत नाही, तर शिवसेना काँग्रेस एका विचाराची कधीच होऊ शकणार नाही, असं वक्तव्य अनंत गीते यांनी केलं आहे. सत्तेसाठी तडजोड म्हणून राज्यात मविआ सरकार स्थापन झालं. शरद पवार हे आमचे नेते नाहीत. राष्ट्रवादीचा जन्मच काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला आहे असं विधान अनंत गीते यांनी केलं होतं.