Top Newsराजकारण

…तर भाजपची ही आदळआपट ठरेल; शिवसेनेचे टीकास्त्र

मुंबई : मुंबईत आजपासून सुरु होणारे अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी ठरेल अशी शक्यता व्यक्त केली र्जे आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन तसे संकेत दिले आहेत. या पार्श्वभूमीवर ‘सामना’च्या आजच्या अग्रलेखातून फडणवीस आणि भाजपवर सडकून टीका करण्यात आली आहे. यात म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांबाबत राज्यपालांनी जे दिशाभूल करणारे वक्तव्य केले त्याचा साधा निषेधही देवेंद्र फड़णवीस यांनी करू नये ? खरे तर असे अनेक विषय वादळी आहेत व त्यावर विधिमंडळात चर्चा होणे गरजेचे आहे. १२ बेशिस्त सदस्यांचे निलंबन, विधानसभा अध्यक्षांची निवड हे विषय ओघाने येतील व जातीत. पण विरोधकांना स्वतःचे तोंड लपवायचे आहे म्हणून ते विधिमंडळात गोंधळ घालणार असतील तर त्यास वादळ म्हणता येणार नाही. फार तर त्यास आदळआपट म्हणावी लागेल. आजच्या अधिवेशनात त्यांचे सगळे आरोप फुसके बार ठरतील त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे आम्ही लक्ष देत नाही.सभागृहातल्या चर्चेला तोंड द्यावे अशी महाविकास आघाडीची अपेक्षा असल्याचे अग्रलेखात म्हटले आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात मागच्या महिनाभरात अनेक घटना घडल्या आहेत. काल देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आम्हाला सरकारशी बोलायचं आहे, आम्ही त्यांना अनेक प्रश्न विचारणार आहोत असं सांगितलं आहे. तसेच नवाब मलिकांना ईडीने ताब्यात घेतलं आहे, त्यांची चौकशी देखील सुरू तरीही महाविकास आघाडीच्या सरकारने त्यांचा राजीनामा घेतलेला नाही. मराठा आणि ओबीसी आरक्षणाचं काय झालं हे सुध्दा आम्ही त्यांना विचारणार असल्याचं देवेंद्र फडणवीस प्रसार माध्यमांना सांगितलं आहे. देवेंद्र फडणवीसांनी आपली भूमिका मांडल्यानंतर सामनाच्या अग्रलेखातून त्यांच्यावर टीका करण्यात आली आहे.

महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांवरती मागच्या अनेक दिवसांपासून भाजपकडून भ्रष्टाचार केल्याचे आरोप केले जात आहेत. त्यामुळे हे अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी ठरेल अशी अनेकांना शंका आहे. नवाब मलिकांना ईडीने ताब्यात घेतल्यानंतर दोन्ही पक्षांचा संघर्ष आपल्याला महाराष्ट्रात पाहायला मिळाला होता. त्यामुळे होणार अधिवेशन कसं असेल हे आपल्याला दिवसभरात समजेल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button