नागपूर : राजकारणाची भाषा बदलली आहे, असं मुळीच वाटत नाही जे महाराष्ट्र द्रोही आहेत, जे मराठी दृष्टी आहेत, जे भ्रष्टाचारी आहेत आणि ज्यांच्या मनात महाराष्ट्राविषयी द्वेष आहे, अशा लोकांना जी भाषा समजते त्याच भाषेतच बोलावं असं आमचे संत सांगून गेले आहेत. ‘तुका म्हणे ऐशा नरा। मोजून माराव्या पैजारा’ असं म्हणत राऊत म्हणाले की, अशा लोकांची काय पूजा करावी, का मिरवणूक काढावी. जर एखादा महाराष्ट्रद्रोही राजकीय पक्षाचा बुरखा घालून आमच्यावर ठुमकत असेल तर मला वाटतं मी खूपच सौम्य भाषा वापरली आहे, अशा शब्दांत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपल्या भाषेसंदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे.
संजय राऊत आज नागपूर दौऱ्यावर आहेत. काल त्यांनी सोमय्या यांच्यावर टीका करताना अपशब्द वापरले होते. आज सकाळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. आघाडी वगैरे हे शब्द बदला. या देशांमध्ये तिसरी आघाडी, चौथी आघाडी, पाचवी आघाडी हे प्रयोग कधीच यशस्वी झाल्याचे दिसले नाही. निवडणुका आल्या की आघाडीची चर्चा सुरू होते काल तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर साडेचार तास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटले. अनेक विषयांवर चर्चा केली. देशाचे राजकारण यावर सविस्तर चर्चा झाली. अनेक विषयांवर सहमतीही झाली आहे. भविष्यातल्या राजकीय दिशा काय असावी यावरही चर्चा झाली. भविष्यात या दोन नेत्यांनी शिवाय इतर अनेक पक्षाचे नेते एकत्रित भेटणार आहे. आम्ही हे कधीच नाही म्हणालो की काँग्रेसच्या शिवाय काही आघाडी बनवायची आहे. जेव्हा ममता बॅनर्जींनी असं सूतोवाच केलं होतं तेव्हा शिवसेना पहिला पक्ष ज्यांनी काँग्रेससोबतच नवी आघाडी बनली पाहिजे, असं मत व्यक्त केलं होतं.
चंद्रकांत पाटलांनी स्वतःचा पक्ष सांभाळावा
राऊत म्हणाले की, चंद्रकांत पाटलांना आमच्या पक्षप्रमुखांना विनंती करण्याची गरज ना.ही मी बाळासाहेब ठाकरेंच्या काळापासून या पक्षाच्या मुख्य प्रवाहात आहे. मी ठाकरे कुटुंबासोबत आहे. चंद्रकांत पाटलांनी आम्हाला न्याय देण्याची गरज नाही त्यांनी स्वतःचा पक्ष सांभाळावा, असं देखील राऊत म्हणाले. राऊतांनी म्हटलं की, भाजपची सवय आहे, जेव्हा ते पराभूत व्हायला लागतात तेव्हा अशा पद्धतीचे आरोप करतात उत्तर प्रदेशात भाजप पराभूत होत आहे. त्यामुळे त्यांचे अखेरचे प्रयत्न सुरू आहेत. देशात लोकशाही संपत आहे, त्याचेच हे परिणाम आहेत.
राऊत म्हणाले की, काल पोलीस आयुक्तांना भेटलो सदिच्छा भेट होती, ते मुंबईलाही अधिकारी राहिलेले आहे म्हणून नागपुरात आल्यावर त्यांना भेटलो. माहिती काढण्यासाठी मला कुठल्याही अधिकाऱ्याला भेटायची गरज नाही. त्यांच्याबद्दल सर्व काही आहे आणि त्यांच्या संदर्भात लवकरच बोलेन. शक्यतो नागपूरला येऊनच बोलेन. नागपूर नक्कीच आता बदललेला आहे. कोरोनामुळे नागपुरात येऊ शकलो नाही, मात्र आता हळूहळू माझ्या नागपूरच्या फेर्या वाढतील, असं राऊतांनी म्हटलं.