राजकारण

…तर आम्ही बंगालचा महाराष्ट्र करु : रामदास आठवले

दलित मतांवर फक्त मायावतींच्या हक्क नाही !

नागपूर : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीवर बोलताना केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले की, अनेक शिवसैनिक नाराज आहेत. महानगरपालिका निवडणुकीत रिपब्लिकन पक्ष भाजपसोबत निवडणूक लढणार आहे. तसेच उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचा बंगाल केला तर आम्ही बंगालचा महाराष्ट्र करु अशी मिश्किल टिप्पणी केली. दरम्यान, आरपीआय उत्तर प्रदेशची विधानसभा निवडणूक लढवणार, दलित मतांवर फक्त मायावतींचा अधिकार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत उतरण्यासाठी दंड थोपटले आहेत. त्यांनी उत्तर प्रदेशात जास्तीत जास्त १८ किंवा ८-१० जागा मिळाल्या तर भाजपसोबत युती करु, असं सांगितलं आहे. तसेच आगामी काळात उत्तर प्रदेशात एक लाख लोकांचं संमेलन घेणार असंदेखील जाहीर केलं आहे.

यावेळी आठवले यांनी उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची (आठवले गट) आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी आरपीआय उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत भाग घेईल. यूपीतील दलित मतांवर फक्त मायावती यांचा अधिकार नाही. आम्ही यूपीमध्ये आगामी काळात एक लाख लोकांचं संमेलन घेणार आहोत, असं सांगितलं. तसेच उत्तर प्रदेशात बाह्मण समाजाचेही संमेलन घेऊ, असेही आठवले म्हणाले.

त्यांनी केंद्रीय तपास यंत्रणेवर दावखण्यात येणाऱ्या अविश्वासावरही भाष्य केलं. त्यांनी केंद्रीय तपास यंत्रणा या निष्पक्ष आहेत. काही शंका असल्यास तपास यंत्रणा चौकशी करतात. आम्ही छापा टाकून काटा काढत नाही. काटा टाकून छापा टाकतो, असे भाष्य आठवले यांनी केलं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button