राजकारण

शिवसेनेचे नाराज नेते सुभाष साबणे देगलूर बिलोली पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार

फडणवीसांनी पूरग्रस्तांची पाहणी करताना दिला धक्का

मुंबई : नांदेड जिल्ह्यातील देगलूर – बिलोली विधानसभेची पोटनिवडणूक होणार आहे. देगलूर विधानसभेसाठी ३० ऑक्टोबरला पोटनिवडणूक होणार आहे. भाजपनं देगलूर बिलोली जागेसाठी शिवसेनेतील नाराज नेते सुभाष साबणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. सुभाष साबणे शिवसेनेत नाराज होते, ते भाजपमध्ये प्रवेश करतील. काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे कोरोना संसर्गामुळे निधन झाले होते. त्यांच्या निधानानंतर ही जागा रिक्त होती. आता या जागेवर पोटनिवडणूक होणार आहे.

देगलूरचे माझी आमदार सुभाष साबणे देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला नरसी नायगावमध्ये पोहचले होते. काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापुरकर यांच्या निधनानंतर या देगलूर बिलोली मतदारसंघात पोट निवडणूक होणार आहे. सुभाष साबणे लवकरच भाजपात प्रवेश करणार आहेत. देवेंद्र फडणवीस आणि सुभाष साबणे यांच्यात बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती आहे.

काँग्रेसकडून पोटनिवडणुकीची तयारी

काँग्रेस नेते रावसाहेब अंतापूरकर यांचे काही दिवसांपूर्वी कोरोनामुळे निधन झाले होते. ते नांदेड जिल्ह्यातील देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. त्यांच्या निधनानंतर देगलूर-बिलोली मतदारसंघाची जागा सध्या रिक्त आहे. त्यामुळे आगामी काळात पोटनिवडणूक होणार आहे. याच कारणामुळे येथील राजकारण तापले आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय पक्षांनी पावलं टाकायला सुरुवात केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button