Top Newsराजकारण

उत्तर प्रदेशात सर्व जागा लढविण्याची भाषा करणारी शिवसेना आज म्हणते १०० जागा लढविणार !

मुंबई : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत कालपर्यंत शिवसेना सर्व ४०३ जागा लढवणार असल्याची घोषणा केली होती. परंतु २४ तासांत पुन्हा ४०३ वरुन खाली येत १०० जागा लढवण्याची घोषणा खासदार संजय राऊत यांनी केली आहे. शिवसेनेनच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ४०३ जागांवर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर संजय राऊत यांनी केवळ १०० जागा लढवणार असल्याचं स्पष्ट केले.

उत्तर प्रदेश निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने कितीही मोठी घोषणा केली तरी ग्राऊंड लेव्हलवर परिस्थिती वेगळी आहे. २०१७ च्या उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत आकडेवारी पाहिली तर शिवसेनेला राज्यात जनाधार नसल्याचं दिसून आलं आहे. २०१७ मध्ये शिवसेनेने उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत ५७ जागा लढवल्या होत्या. त्यातील ५६ जागांवर शिवसेनेच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झालं होतं. केवळ एका जागेवर डिपॉझिट वाचवण्याची नामुष्की शिवसेनेवर आली होती.

२०१७ च्या निवडणुकीत उत्तर प्रदेशात एकूण ८ कोटी ६७ लाख २८ हजार ३२४ लोकांनी मतदान केले. यात १ टक्के मतदानही शिवसेनेला झालं नाही. २०१७ मध्ये शिवसेनेच्या ५७ उमेदवारांना मिळून एकूण ८८ हजार ५९५ मतं मिळाली. या ५७ जागांपैकी ४३ मतदारसंघ असे होते जिथे शिवसेनेच्या उमेदवाराला १ हजारपेक्षाही कमी मतदान झाले. तर काही जागा अशा होत्या ज्याठिकाणी शिवसेनेच्या उमेदवाराला २०० मतंही मिळाली नाहीत. अनेक जागांवर शिवसेनेच्या उमेदवाराला नोटापेक्षाही कमी मतदान झाले.

केवळ २ जागांवर शिवसेनेचं अस्तित्व

२०१७ च्या निवडणुकीत एका जागेवर शिवसेनेच्या उमेदवाराचं डिपॉझिट वाचलं होतं. गोंडा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या महेश तिवारी यांना ३५ हजार ६०६ मतं मिळाली होती. या मतदारसंघात शिवसेना चौथ्या स्थानावर होती. गोंडा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवाराचं डिपॉझिट वाचलं होतं. गोंडासोबतच बदायू विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवाराला १४ हजार ५७६ मतं मिळाली होती. परंतु या मतदारसंघात डिपॉझिट वाचवता आलं नाही.

उत्तर प्रदेशात शिवसेनेचा मविआ प्रयोग

उत्तर प्रदेशच्या पुढील निवडणुकीत शिवसेना १०० जागा लढवणार असल्याचं सांगत आहे. पण या निवडणुकीत हे महाराष्ट्राप्रमाणेच महाविकास आघाडीचा प्रयोग करण्याची शक्यता आहे. याबाबत शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले की, उत्तर प्रदेशात काही शेतकरी संघटनांचा आम्हाला पाठिंबा आहे. पश्चिमी उत्तर प्रदेशातील शेतकरी संघटनांनी शिवसेनेला जाहीर पाठींबा दिला आहे. उत्तर प्रदेशात युती झाली नाही तर आम्ही एकटं लढू असा निर्धार संजय राऊतांनी बोलून दाखवला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button