आ. नितेश राणेंचा कोठडीतील मुक्काम वाढला !

मुंबई : शिवसेना कार्यकर्ते संतोष परब हल्ला प्रकरणामुळे भाजपचे आ. नितेश राणे पुरते अडचणीत सापडले आहे. जामीन अर्जासाठी धावाधाव करत असताना आणखी एक दिवस कोठडीत मुक्काम वाढला आहे. भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनामुळे सोमवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे सोमवारची सुनावणी पुढे ढकलली आहे.
शिवसैनिक हल्ला प्रकरणामुळे नितेश राणे मागील चार दिवसांपासून न्यायालयीन कोठडीत आहे. पोलीस कोठडीतून सुटका झाल्यामुळे नितेश राणे जामीन अर्जासाठी धावाधाव करत आहे. पण, रविवारची सुट्टी आल्यामुळे सुनावणी सोमवारी ढकलण्यात आली होती. सोमवारी नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर जिल्हा न्यायालायत सुनावणी होणार होती. दुपारी दोननंतर सुनावणी होण्याची शक्यता होती. पण, भारतरत्न लता मंगेशकर यांचे दुःखद निधन झाले असून त्यांच्या निधनामुळे संगीत आणि कला विश्वाची अपरिमित हानी झाली आहे. या महान गायिकेला श्रद्धांजली वाहण्यासाठी सोमवार, दि. ७ फेब्रुवारी रोजी राज्यात दुखवटा म्हणून सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे नितेश राणे यांनी सुनावणी उद्या होणार नाही. नितेश राणे सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. सध्या त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे हे सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात असून आमदार नितेश राणे यांच्या जामीन अर्जाच्या निकालाबाबत सर्वांना उत्सुकता लागली होती. पण, आता या प्रकरणी मंगळवारी सुनावणी होणार आहे.




