राजकारण

रश्मी शुक्ला यांनी फोन टॅपिंग करताना गृहसचिवांची परवानगी घेतलीच नव्हती : जितेंद्र आव्हाड

मुंबई : परमवीर सिंग यांच्या पत्रानंतर अखेरीस महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे..विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपाला उत्तर द्यायला सगळे मंत्री एकत्र आल्याचे चित्र आहे. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. रश्मी शुक्ला यांनी वेगळ्याच नावांनी फोन टॅपिंगच्या परवानग्या घेऊन अनेक मंत्र्यांचे फोन टॅप केल्याचा धक्कादायक आरोप आव्हाड यांनी केलाय. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचा इशारा दिलाय.

रश्मी शुक्ला यांच्याबाबत खळबळजनक दावा करताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, कोणाचाही फोन टॅप करायचा असेल तर त्यासाठी अतिरिक्त मुख्य गृह सचिवांची रितसर परवानगी लागते. रश्मी शुक्लांनी अमुक एका क्रमांकासाठी परवानगी घेतली होती का, या प्रश्नाचं उत्तर कुंटे यांनी नकारात्मक स्वरुपात दिलं. पोलीस बदली रॅकेट प्रकरणी सत्ताधाऱ्यांनी परवानगी शिवाय फोन टॅपिंग केलेच कसा असा सवाल केला आहे. या प्रकरणी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरच्या माध्यमातून रश्मी शुक्ला यांच्यावर टीका केली आहे. रश्मी शुक्ला यांना फोन टॅपिंगची अतिशय वाईट सवय होती. हे आधीच्या सरकारापासून सुरु होतं. त्यांचं एक पत्र उघडकीला आलं आहे. यात त्यांनी माझी चुकी झाली असल्याचं सांगत माफी मागितली आहे.

रश्मी शुक्ला या पोलीस अधिकारी आहेत म्हणून कोणत्याही नागरिकांचा फोन टॅप कसा करू शकतात’, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे. फोन टॅपिंग करता नियम व कायदे आहेत, या प्रकरणात असे दिसते की अधिकार्‍यांना वाटलं की ते काहीही करु शकतात आणि याची कोण खात्री देईल की अजून किती जणांचे फोन टॅपिंगला लावले होते? असा गंभीर आरोपच मंत्री आव्हाड यांनी केलं आहे.

रश्मी शुक्ला यांच्या अहवालाने त्याच फक्त एक सरळ आणि स्वच्छ अधिकारी आहेत आणि बाकीचे सर्वच भ्रष्ट आहेत हा पोलीस खात्याचा अपमान आहे.. शुक्ला यांनी नाव घेतलेल्या न सर्व अधिकाऱ्यांनी सरकारचा सल्ला घेऊन त्यांच्याविरोधात कोर्टात जावे अशीही भूमिका जितेंद्र आव्हाड यांनी मांडली आहे.
फोन टॅपिंग करण्याच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याचा कट होता, असं म्हणत त्याच पत्राच्या माध्यमातून सरकारला बदनाम केलं जात असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी शुक्ला यांच्यावर केला.

“रश्मी शुक्ला यांनी परवानगी एकाच्या नावाने घेतली आणि फोन टॅपिंग दुसऱ्या लोकांचे केलेत. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात हे सर्व प्रकार केले आहेत. त्याचा उपयोग आता महाराष्ट्र विकास आघाडी सरकार विरुद्ध होतोय. फोन टॅपिंग करणं हा मोठा गुन्हा आहे. जर फोन टॅपिंग करायचे असेल तर संबंधित व्यक्तीची सविस्तर माहिती ज्यात नाव, नंबर दिला गेला पाहिजे,” असंही जितेंद्र आव्हाड यांनी नमूद केलं.

‘परवानगी एकाच्या नावाची आणि फोन टॅपिंग दुसऱ्याची असा प्रकार’

जितेंद्र आव्हाड म्हणाले, “केंद्र सरकारने काही नियम दिले आहेत. त्यात कोणत्या प्रकारात फोन टॅप करता येतात याविषयी सांगण्यात आले आहे. यात राष्ट्र घातक कृत्य, परकीय देशातील अतिरेकी संघटनेशी संबंध या प्रकारांशिवाय इतर परिस्थिती फोन टॅपिंग करता येत नाही. याला अपवाद येथी शांतता भंग करणाऱ्या व्यक्तीचा फोन टॅप करु शकतो. त्यामुळे रश्मि शुक्ला यांनी जी कारणं दिली होती ती संयुक्तिक नव्हती. त्यांनी ज्या फोन टॅपिंगच्या परवानग्या घेतल्या त्या चुकीच्या नावाने घेतल्या होत्या. परवानगी एकाच्या नावाची आणि फोन टॅपिंग दुसऱ्याची असा प्रकार करण्यात आला. यात अनेक मंत्र्यांचेही फोन टॅप करण्यात आले. हा राईट टू प्रायव्हसीचा भंग आहे. हे अनेकवेळा करण्यात आलं.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button