Top Newsराजकारण

नारायण राणेंच्या इंग्रजीचे शिवसेनेकडून वाभाडे

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या लोकसभेतल्या व्हायरल होणाऱ्या व्हीडिओवरुन आता नवा वाद निर्माण झालाय. राणेंना ट्रोल करत शिवसैनिकांकडून हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला जातोय. लोकसभेमध्ये नारायण राणे यांच्यामुळे महाराष्ट्राची मान खाली गेली अशा शब्दात शिवसेनेच्या नेत्या मनिषा कायंदे तुटून पडल्यात. डीएमकेच्या खासदार कनिमोझी यांनी मंत्री नारायण राणे यांच्या खात्यासंदर्भात प्रश्न विचारला. खरंतर कनिमोझींनी बंद पडलेल्या आणि डबघाईला आलेल्या उद्योगांसाठी केंद्र सरकारने आणलेल्या योजना उद्योजकांपर्यंत कशा पोहोचवणार असा प्रश्न विचारला. मंत्री नारायण राणेंना मात्र उत्तर व्यवस्थित देता आलं नाही असं म्हणत शिवसैनिकांनी राणेंचा हा व्हीडिओ व्हायरल करायला सुरुवात केलीय.

खरतर पवारांना खुर्ची देण्याच्या वादावर बोलताना संजय राऊतांचा संयम सुटला. आणि नवा वाद सुरु झाला. याच मुद्यावरुन संजय राऊत आणि भाजप नेत्यांमध्ये सामना रंगलाय. राज्यातल्या काही नेत्यांची जीभ जास्तच चालायला लगली असं म्हणत नितेश राणेंनी संजय राऊतांवर निशाणा साधला.

नितेश राणेंनी राऊतांना त्यांनी कंगना रनौतबद्दल वापरलेल्या शब्दाची आठवन करुन दिली. पोलिसांचा गराडा बाजूला ठेवा मग जीभ कशी वापरायची ते दाखवून देऊ असा इशाराही नितेश राणेंनी दिला. संजय राऊत विधानावर ठाम राहत नाहीत त्यामुळे राऊतांनी बाळासाहेब ठाकरेंना गुरु मानू नये असही नितेश राणे म्हणाले.

नितेश राणेंच्या टीकेला सेनेचे उत्तर

राऊतांनी वापरलेल्या शब्दाचा वादही आता वाढत जातोय. सुरुवातीला राऊतांनी पवारांना दिलेल्या खुर्चीवरुन भाजप नेत्यांनी राऊतांना टार्गेट केलं. त्यावर उत्तर देताना राऊतांचा संयम सुटाल आणि नवा वाद सुरु झाला. आता संसदेतल्या व्हीडिओवरुन शिवसैनिकांनी राणेंना ट्रोल केल्याने नवा वाद सुरु झालाय.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button