अर्थ-उद्योगतंत्रज्ञान

शेमा ई- व्हेईकल अँड सोलार प्रा. लि. (एसईएस) तर्फे दोन नवीन इलेक्ट्रिक दुचाकींचे अनावरण

मुंबई : शेमा इलेक्ट्रिक ह्या ओदिशामधील युवा मेक- इन इंडिया ईव्ही उत्पादक कंपनीने ईव्ही इंडीया एक्स्पो २०२१ मध्ये आपल्या इलेक्ट्रिक दुचाकींच्या आकर्षक श्रेणीचे सादरीकरण केले. प्रसिद्ध ईव्ही एक्स्पो २०२१ च्या मंचावर ह्या ब्रँडला त्यांच्या एसईएस टफ (उच्च गती) आणि एसईएस हॉबी (कमी गती) ह्यांच्या शुभारंभानंतर ब्रँडचे अनेक दर्शकांनी कौतुक केले. तसेच, कमी‌ वेगाच्या प्रकारामधील त्यांच्या उत्पादनांची संपूर्ण उपलब्ध श्रेणी- एसईएस झूम, एसईएस बोल्ड, एसईएस ईगल आणि एसईएस टफ ह्या श्रेणीतील उत्पादनांचेही त्यांचे अद्ययावत तंत्रज्ञान आणि शैलीदार डिझाईन ह्यामुळे उपस्थित लोकांनी कौतुक केले.

एसईएस टफ (उच्च गती): बीटूबी प्रकारासाठी उच्च गतीची दुचाकी ब्रँडने समोर आणली आहे. ह्या बहुउपयोगी इलेक्ट्रीक बाईकची सर्वाधिक गती ६० किमी प्रति तास असेल व ती १५० किलो वजनसह १५० किमी/ तास ही गती घेऊ शकते. एसईएस टफला एक ड्युअल ६० व्ही ३० एएच लिथियम डिटॅचेबल बॅटरीने सक्षम केलेले आहे.

एसईएस हॉबी: ह्या ब्रँडचे हे दुसरे उत्पादन १०० टक्के भारतीय बनावटीची ई- स्कूटर एसईएस हॉबी हे आहे. त्यामध्ये २५ किमी/ तास ही सर्वाधिक गती मिळते व एका चार्जवर ती १०० किलोमीटर जाते. आकर्षक शैली आणि उच्च दर्जाच्या तंत्रज्ञानासह ह्या उत्पादनाचे उपस्थितांनी कौतुक केले. एसईएस हॉबीमध्ये ६० व्ही आणि ३० एएच डिटॅचेबल बॅटरी आहे. पूर्ण चार्ज होण्यासाठी ४ तास लागतात. सध्या ब्रँडची कमी गतीच्या ई स्कूटर प्रकारामध्ये ०५ उत्पादने आहेत व एक उच्च गतीच्या फेम- II प्रकारातील उत्पादन आहे.

ह्या नवीन उत्पादनाच्या शुभारंभाबद्दल बोलताना, शेमा इलेक्ट्रीकचे संस्थापक आणि सीओओ योगेश कुमार लथ ह्यांनी म्हंटले, भारतामध्ये ईव्ही मार्केट नवीन आहे आणि देशाने ह्या बाबतीत खूप मोठी उद्दिष्टे ठेवली आहेत. ते साध्य करण्यासाठी आवश्यक आहे की, सर्व घटकांनी सर्वंकष विकासासाठी सक्रिय प्रकारे त्यत सहभाग घेतला पाहिजे. आम्ही ग्राहकांच्या अपेक्षा व गरजा लक्षात घेऊन सकारात्मक प्रकारे ईव्ही दुचाकींचे उत्पादन करत आहोत. आम्ही ह्या उत्पादनांमध्ये नावीन्यपूर्णता आणणे व त्यांना आणखी प्रगत करणे सुरू ठेवू व दुस-या बाजूला आमच्या आउटरीचमध्येही विस्तार करू. ह्या आर्थिक वर्षाच्या शेवटी आम्ही बाजारामध्ये २-३ नवीन उच्च गतीची उत्पादने सुरू करू आणि पूर्ण भारतामध्ये आमचे १०० पेक्षा जास्त वितरक असतील.

शेमा इलेक्ट्रिकचे सध्या ७५75 वितरक आहेत व ह्या ब्रँडची १३ राज्यांमध्ये उपस्थिती‌आहे. भारतातील सर्वांत प्रमुख बाजारपेठ असलेल्या राजस्थान, पंजाब, हरयाणा, केरला व कर्नाटक, गुजरातमध्ये पुढील ६ महिन्यांमध्ये आम्ही आणखी खोलवर जाण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button