आरोग्य

शरद पवारांनी पुन्हा महाराष्ट्राचे मार्गदर्शन करण्यासाठी रुजू व्हावे : चंद्रकांत पाटील

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पोटात दुखू लागल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शरद पवार यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली होती. सर्वच राजकीय नेतेमंडळी शरद पवारांची प्रकृती स्थिर होण्यासाठी प्रार्थना करु लागली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील शरद पवार यांची प्रकृती लवकर बरी होण्यासाठी ईश्वरचरणी प्रार्थना केली आहे. शरद पवार पुन्हा महाराष्ट्राचे मार्गदर्शन करण्यासाठी रुजू व्हावेत असे भावनिक ट्विट भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ट्विट केले आहे की, शरद पवार साहेबांची प्रकृती अचानक बिघडल्याचे वृत्त कळले. ईश्वरचरणी प्रार्थना करतो की, त्यांनी लवकरात लवकर रुग्णालयातून डिस्चार्ज घेऊन पुन्हा महाराष्ट्राचे मार्गदर्शन करण्यासाठी रुजू व्हावे. असे भावनिक ट्विट भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

देवेंद्र फडणवीसांचीही प्रार्थना
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रकृती लवकर बरी होण्यासाठी प्रार्थना केली आहे. शरद पवार यांची प्रकृती अस्वस्थाबद्दल कळले त्यांना लवकर बरे वाटावे अशी मी प्रार्थना करतो. असे ट्विट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

आपली प्रकृती स्थिर : शरद पवार
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली प्रकृती स्थिर असल्याचे ट्विट करत सांगितले आहे. तसेच ज्यांनी ज्यांनी प्रकृतीबाबत विचारणा केली आहे. त्या सर्वांचे शरद पवार यांनी ट्विटद्वारे आभार मानले आहेत.

रोहित पवारांचे भावुक ट्विट
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार म्हणतात, ‘आदरणीय पवार साहेब कोणताही त्रास तुमच्यासाठी किरकोळ असला तरी आमच्यासाठी तो मोठा असतो. लवकर बरं व्हा! सर्वांच्या सदिच्छा तुमच्यासोबत आहेत! तुम्ही लवकर बरे व्हावेत म्हणून विठुरायाच्या चरणी प्रार्थना करतो’, असे म्हणत त्यांनी भावनिक ट्विट केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button