राजकारण

आमदार, वरिष्ठांवर छळाचे आरोप करणाऱ्या पारनेरच्या तहसीलदारांविरोधात गंभीर तक्रारी

अहमदनगर : पारनेर तालुक्याच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची सुसाईड ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर राज्यात खळबळ उडाली. त्यानंतर राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया आल्या. मात्र, आता याच तहसीलदार देवरे यांच्या विरोधात भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झालेत. याबाबतचा चौकशी अहवाल अहमदनगर जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी उपविभागीय आयुक्तांकडे सादर केलाय. या अहवालात महिला तहसीलदार देवरे यांच्यावर गंभीर ठपका ठेवण्यात आलाय. त्यामुळे आता पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचं दिसत आहे.

तहसीलदार देवरे यांच्या विरोधात जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सादर केलेल्या अहवालात अनेक घोटाळे उघड झाल्याचं बोललं जातंय. देवरे यांनी अनेक कामांमध्ये हस्तक्षेप करून हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवण्यात आलाय. याशिवाय वाळू साठ्यातही गैरव्यवहार करून शासनाचे मोठं नुकसान केल्याचा आरोप आहे. जमीन प्रकरणात गैरव्यवहार करणे, शरतील कोविड सेंटर, हॉस्पिटल विरोधात चौकशी करून कागदपत्रे सादर न करणे, शासकीय कामात नितांत सचोटी व कर्तव्यपरायणता न ठेवणे आणि आपली कामाची जबाबदारी नीटपणे पार न पाडणे, कामात हयगय करणे आणि वरिष्ठांच्या आदेशाचा भंग करणे असे अनेक गंभीर आरोप तहसीलदार देवरे यांच्यावर करण्यात आलेत.

देवरे यांनी महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, 1979 म नियम 3 च्या तरतुदीचा भंग केल्याचे प्रथमदर्शनी दिसू येत असल्याचंही जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या अहवालात म्हटलंय. डेडीकेटेड कोव्हिड हेल्थ सेंटर, पूर्णावाद भवन इमारत, ओंकार हॉस्पिटलच्या समोर नवी पेठ पारनेर विरुध्द तक्रारीच्या अनुषंगाने तपासणी करताना तहसिलदार पारनेर यांनी चौकशी समितीस कोणतीही कागदपत्रे उपलब्ध करून न देणे याचाही अहवालात उल्लेख आहे. यावरून तहसिलदार पारनेर यांच्यावर जबाबदारी पालनात अक्षम्य हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवण्यात आलाय.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button