राजकारण

शिवसेना आ. भास्कर जाधव यांना अखेर सुरक्षा

मुंबई : पावसाळी अधिवेशातील पहिल्या दिवशी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि भाजप आमदारांमध्ये जोरदार राडा पाहायला मिळाला. इतकंच नाही तर अध्यक्षांच्या दालनात आपल्याला धक्काबुक्की आणि शिवीगाळ झाल्याचा आरोप तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी केला होता. त्यानंतर अखेर जाधव यांना दोन सुरक्षारक्षक देण्यात आले आहेत. अधिवेशनात झालेल्या गोंधळानंतर महाविकास आघाडीनं जाधव यांना सुरक्षा देण्याचा निर्णय घेतलाय.

विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन भास्कर जाधव यांनी चांगलंच गाजवलं. ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षण, कोरोना, शेतकरी, मंत्र्यांवरील भ्रष्टाचाराचे आरोप अशा अनेक मुद्द्यांवर भाजप नेते सरकारला धारेवर धरणार असा अंदाज व्यक्त केला जात होता. सुरुवातीचा काही काळ तसं चित्रही पाहायला मिळालं. मात्र भास्कर जाधव जेव्हा तालिका अध्यक्ष म्हणून बसले, त्यावेळी सभागृहातील चित्रच पालंटलं. जाधव यांनी तालिका अध्यक्ष म्हणून सभागृहात आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळालं. सभागृहातील जाधव यांच्या पवित्र्यामुळे त्यांना सोशल मीडियातून धमक्या येत आहेत असा आरोप महाविकास आघाडीतील नेत्यांकडून करण्यात येत आहे. त्यानंतर गृह खात्याने भास्कर जाधव यांना दोन सुरक्षा रक्षकांकडून सुरक्षा पुरवण्यात येणार आहे.

सुधीर मुनगंटीवार सभागृहात बोलत असताना विरोधकांनी त्यांना मध्येमध्ये टोकण्याचा प्रयत्न केला. त्यावर अनिल देशमुख असेच मध्ये मध्ये बोलत होते. आता आत जात आहेत, अशी धमकीच सुधीर मुनगंटीवार यांनी सभागृहात दिली. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी जोरदार आक्षेप घेत सभागृहात गोंधळ घातला. तर, विधानसभा अध्यक्षांनी हे वाक्य कामकाजातून काढून टाकण्याच्या सूचना दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button