कुल्लू – केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या स्वागतासाठी भुंतर येथे गेलेल्या मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्या सुरक्षेत तैनात असलेले सुरक्षा अधिकारी आणि कुल्लूचे पोलीस अधीक्षक गौरव यांच्यात जबरदस्त हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. अचानक झालेल्या या झटापटीचा एक व्हिडिओदेखील समोर आला आहे. यात संरक्षण कर्मचारी एसपींना लाथा-बुक्क्यांनी मारताना दिसत आहेत. मात्र, ही हाणामारी नेमकी कशामुळे झाली, हे अद्याप कळू शकलेले नाही.