फोकसराजकारण

समीर वानखेडे मुस्लीम असल्यानेच निकाह केला होता; मौलानांचा दावा

मौलाना संविधानापेक्षा मोठे आहेत का? क्रांती रेडकर संतप्त

मुंबई : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडेंच्या अडचणी वाढल्या आहेत. वानखेडेंचा पहिला निकाह लावणाऱ्या मौलाना मुझम्मील अहमद यांनी केलेल्या दाव्यांमुळे प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे. निकाहावेळी समीर वानखेडे आणि शबाना दोघेही मुस्लिम होते. समीर मुस्लिम नसते, तर मी त्यांचा निकाह लावलाच नसता, असा दावा त्यांनी केला आहे.

समीर आणि शबाना यांचा विवाह सोहळा २००६ मध्ये संपन्न झाला. त्यावेळी समीर यांनी आपण मुस्लिम असल्याचं सांगितलं होतं, अशी माहिती मौलाना मुझम्मील अहमद यांनी दिली. मंत्री नवाब मलिक यांनी शेअर केलेला निकाहनामा खरा असल्याचंदेखील मौलानांनी म्हटलं आहे. ‘त्यावेळी मी निकाह लावला होता. निकाहनामा अगदी योग्य आहे. त्यावेळी समीर, शबाना (समीर यांची पहिली पत्नी), त्याचे वडील सगळे मुस्लिम होते. समीर हिंदू असते, तर निकाहचा झाला नसता. कारण शरियतनुसार असा निकाह होत नाही. शरियतविरोधात जाऊन काझी निकाह लावत नाही. आज समीर काहीही सांगत असले, तरीही त्यावेळी ते मुस्लिमच होते,’ असा दावा मौलाना मुझम्मील अहमद यांनी केला.

समीर आणि शबाना यांचा निकाह झाला त्यावेळी जवळपास २ हजार जण उपस्थित होते. यामध्ये अनेक हायप्रोफाईल व्यक्ती होत्या. संपूर्ण व्यवस्था झाल्यावर मी निकाहासाठी पोहोचलो आणि १५ मिनिटांत निकाहनामा वाचला. समीर यांचा निकाह पूर्णपणे इस्लामिक पद्धतीनं झाला, अशी माहिती अहमद यांनी दिली. समीर आणि शबाना यांचा निकाहनामा आज सकाळीच मंत्री नवाब मलिक यांनी ट्विटरवर शेअर केला. ‘२००६ मध्ये ७ डिसेंबरला गुरुवारी रात्री ८ वाजता दाऊद वानखेडे आणि शबाना कुरेशी यांचा निकाह झाला होता. मुंबईतील अंधेरी पश्चिमेतील लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये निकाह संपन्न झाला होता,’ असं मलिक यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

मौलाना संविधानापेक्षा मोठे आहेत का? क्रांती रेडकर संतप्त

निकाह करणाऱ्या मौलानाने समीर मुस्लीम असल्यानेच निकाह केल्याचं म्हटलं होतं त्यावर क्रांतीने भारतीय संविधानापेक्षा मौलाना मोठे आहेत का? असं विधान केले आहे. मलिकांनी निकाहनामा जारी केल्यावर समीर वानखेडे यांनी मी धर्म बदलला आहे का? मी जन्माने हिंदू आहे आणि आताही आहे. मुस्लीम मुलीशी लग्न केल्याने मुस्लीम होतो का? असा सवाल समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांनी केला आहे.

मलिकांनी केलेल्या आरोपावर वानखेडे यांचं कुटुंब चांगलेच भडकले आहे. क्रांती रेडकर म्हणाल्या की, जात प्रमाणपत्रानुसार समीर वानखेडे हिंदू आहेत ते नाकारलं जाऊ शकत नाही. नवाब मलिक यांनी कोर्टात जावं. मंत्री नवाब मलिक खूप खालच्या पातळीवर गेलेत आहेत. त्यांना राजीनामा द्यावाच लागेल. आरोप करताना लाज वाटली पाहिजे. हिंदू महार असल्याचं प्रमाणपत्र सासऱ्यांनी सगळ्यांना दाखवलं आहे. नवाब मलिकांनी जे आरोप केलेत ते कोर्टात सिद्ध करावं. जितक्या खालच्या दर्जाला जात आहे त्याने असंच वाटतं मंत्रिपदाची काही देणंघेणं नाही असं तिने म्हटलं आहे.

माझी बायको मला लाडाने दाऊद हाक मारायची. निकाहनामात जे ऊर्दू भाषेत लिहिलं आहे ते मला कळत नाही. पण माझी सही त्यात बघा. ती इंग्रजीत ज्ञानदेव वानखेडे असं आहे. नवाब मलिक खासगी आयुष्यात डोकावत आहेत. मी ज्ञानदेव वानखेडे आहे. मी सरकारी अधिकारी होतो. मग माझ्या कागदपत्रांची तपासणी न करताच नोकरीला ठेवलं होतं का? नवाब मलिकांविरोधात लवकरच कायदेशीर मार्गाने उत्तर देऊ असं सांगत समीर वानखेडे यांच्या वडिलांनी त्यांचे जात प्रमाणपत्र सगळ्यांसमोर दाखवलं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button