राजकारण

सचिन वाझेला हृदयविकाराचा त्रास; भिवंडीत खासगी रुग्णालयात दाखल

भिवंडी : सचिन वाझे याच्यावर बायपास शस्त्रक्रिया करण्यासाठी त्याला भिवंडीतील खासगी रुग्णालयात मंगळवारी ४ वाजता दाखल करण्यात आले आहे अशी माहिती भिवंडी पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी दिली आहे.

मनसुख हिरेन हत्याकांडाबरोबरच मुकेश अंबानी यांच्या अंटालिया घराजवळ जिलेटीन ठेवल्याने सचिन वाझे देशभर चर्चेत आला आहे. या प्रकरणात त्याला अटक केल्यानंतर त्याची रवानगी तळोजा कारागृहात करण्यात आली होती. कारागृहात वाझे यास हृदयविकाराचा त्रास झाल्याने वाझे याच्या निकटवर्तीयांनी खासगी रुग्णालयात उपचारासाठी परवानगी मागितली होती.

एखाद्या गंभीर गुन्ह्यातील आरोपीला खासगी रुग्णालयात नेमके का दाखल करण्यात आले, हे सध्या तरी न उलगडणारे कोडे आहे. महत्वाचे म्हणजे सचिन वाझे अटकेपूर्वी पोलीस अधिकारी असल्याने त्याचा ठाण्यात चांगलाच दबदबा आहे. त्यातच भिवंडीतील ज्या खासगी रुग्णालयात सचिन वाझे यास दाखल केले आहे तेथून ठाणे शहर अगदी हाकेच्या म्हणजेच सधारणतः तीन ते चार किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे सचिन वाझे यास खरोखरच उपचारासाठी भिवंडीसारख्या ठिकाणी दाखल केले आहे किंवा त्यामागे काहीतरी राजकारण असावे अशी चर्चा सध्या शहरात रंगू लागली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button