Top Newsराजकारण

युक्रेनसोबत चर्चेस रशिया तयार; पुतिन शिष्टमंडळ पाठवणार !

मास्को/किव्ह : रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा आज दुसरा दिवस आहे. युद्धात आतापर्यंत शेकडो लोकांचा मृत्यू झाला असून, युक्रेनच्या पायाभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रशियन सैन्य राजधानी किव्हमध्ये दाखल झाले आहे. यातच आता युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी सैन्य बंकरमध्ये आश्रय घेतल्याची माहिती मिळत आहे.

गेल्या दोन दिवसांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. यात दोन्ही देशाचे मोठे नुकसान झाले आहे. परंतु, आता ही युद्धजन्य परिस्थिती निवळण्याची शक्यता आहे. कारण रशिया युक्रेनसोबत चर्चेसाठी तयार झाला आहे. त्यासाठी रशिया आपले एक शिष्टमंडळ चर्चेसाठी युक्रेनला पाठवणार आहे. हे शिष्टमंडळ युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्सकी यांच्यासोबत चर्चा करणार आहे.

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनशी चर्चा करण्यास सहमती दर्शवली आहे. चीनने याबाबतची माहिती दिली आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी पुतीन यांच्याशी फोनवर चर्चा केली आहे. पुतिन म्हणाले की, ते युक्रेनसोबत उच्चस्तरीय चर्चेसाठी तयार आहेत. याआधी युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी पुतीन यांना चर्चेचा प्रस्ताव पाठवला होता, त्यावर त्यांनी चर्चेची तयारी दर्शवली आहे.

युक्रेनच्या अनेक शहरांवर रशियाचा ताबा

युक्रेनच्या प्रमुख शहरांवर रशियन सैन्याने ताबा मिळवला आहे. रशियन आक्रमणामुळे संपूर्ण देशात भीतीचे वातावरण आहे. यातच रशियाने युक्रेनधील चेर्नोबिल अणु उर्जा प्रकल्पावर आधीच कब्जा केला आहे. दरम्यान, कीवपासून साधारणपणे ६० किलोमीटर अंतरावर वायव्येकडे असलेल्या इव्हान्कीव्ह येथे नदीवरील एक पूल शुक्रवारी सकाळच्या सुमारास नष्ट झाला आहे.

युक्रेनची राजधानी किव्हच्या रस्त्यावर रशियन सैन्याच्या गाड्या

युक्रेन आणि रशियातीलयुद्ध दुसऱ्या दिवशी शमण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. युक्रेनच्या सैन्याला रशियाने शरणागती पत्करण्यास सांगितले, तेव्हा युक्रेनने रशियाला चर्चेचा प्रस्ताव पाठविला आहे. यावेळी युक्रेन सैनिकांनी प्रतिकार थांबविला तर रशिया चर्चा करेल अशी अट रशियाने घातली होती. अखेर आता रशिया आपले प्रतिनिधी युक्रेनमध्ये पाठविण्यास तयार झाला आहे.

या साऱ्या घडामोडींना आता उशिर झाला असून रशियाच्या सैन्याने किव्हच्या रस्त्यावर ताबा मिळविला आहे. रशियाच्या चिलखती गाड्या किव्हच्या रस्त्यांवर दिसू लागल्य़ा आहेत. यामुळे किव्ह हरल्यात जमा आहे. आता पुढील दिशा चर्चेअंती स्पष्ट होणार आहे. अमेरिका आणि नाटोने साथ सोडल्याने युक्रेनवर ही परिस्थिती ओढवल्याचा आरोप युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी केला आहे. यामुळे अमेरिकेची धोका देण्याची मानसिकता पुन्हा एकदा जगासमोर आली आहे.

रशियाने युक्रेनवर हल्ला करण्याच्या आधी नाटो देशांनी युक्रेनला मदत करण्याचे आश्वासन दिले होते. पण, ऐनवेळी या देशांनी आपला शब्द पाळला नाही. यामुळे बलाढ्य अशा रशियासमोर युक्रेन युद्धात एकटा पडला. रशियाने युक्रनेच्या प्रमुख सैन्य स्थळांवर हल्ले केले, अनेक शहरांचा ताबा मिळवला. अणु उर्जा प्रकल्पही ताब्यात घेतला. या सर्व घडामोडीनंतर आता युक्रेनकडे तीन पर्याय उरले होते. रशियन सैन्य युक्रेनच्या राष्ट्रपती भवनात कधीही घुसू शकते. युक्रेनने शरणागती पत्करावी असे अनेक संरक्षण तज्ञ म्हणत आहेत. युक्रेनने शरणागती पत्करली तर तेथील लाखो लोकांचे प्राण वाचतील.

व्लादिमीर पुतीन यांना मोठा धक्का! युरोपातील संपत्ती गोठवण्याचे आदेश

युक्रेन आणि रशियातील युद्ध आता विकोपाला पोहोचलं आहे. रशियानं आक्रमक भूमिका घेत युक्रेनची राजधानी कीव जवळपास ताब्यात घेतली आहे. कीवच्या रस्त्यावर सर्व ठिकाणी रशियन टँक फिरताना पाहायला मिळत आहेत. तसंच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी सैन्य बंकरमध्ये आश्रय घेतल्याची माहिती मिळत आहे. पुतीन यांना रोखण्यासाठी युरोपियन युनियननं देखील मोठा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. यूएननं रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि परराष्ट्र मंत्री लावरोव्ह यांच्याशी निगडीत युरोपातील संपत्ती गोठविण्याचे आदेश दिल्याची माहिती एएफपी वृत्तसंस्थेनं दिली आहे. यामुळे रशियाची कोंडी करण्याचा प्रयत्न युरोपियन युनियननं सुरू केला आहे.

रशियानं युद्धाचा निर्णय घेतल्यामुळे याआधीच युरोपियन युनियन आणि अमेरिकेनं अनेक आर्थिक निर्बंध रशियावर लादले आहेत. त्यात आता पुतीन आणि लावरोव्ह यांची युरोपातील निगडीत संपत्ती गोठविण्याचा निर्णय घेऊन यूएननं मोठा धक्का दिला आहे. गेल्या दोन दिवसांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. यात दोन्ही देशाचे मोठे नुकसान झाले आहे. परंतु, आता ही युद्धजन्य परिस्थिती निवळण्याची शक्यता आहे. कारण रशिया युक्रेनसोबत चर्चेसाठी तयार झाला आहे. त्यासाठी रशिया आपले एक शिष्टमंडळ चर्चेसाठी युक्रेनला पाठवणार आहे. हे शिष्टमंडळ युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्सकी यांच्यासोबत चर्चा करणार आहे. युक्रेनच्या प्रमुख शहरांवर रशियन सैन्याने ताबा मिळवला आहे. रशियन आक्रमणामुळे संपूर्ण देशात भीतीचे वातावरण आहे. यातच रशियाने युक्रेनधील चेर्नोबिल अणु उर्जा प्रकल्पावर आधीच कब्जा केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button