पंतप्रधान मोदींमुळे खा. नवनीत राणांवर चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ! रुपाली चाकणकरांची खोचक टीका

मुंबई : सोशल मीडियावर कायम सक्रिय असणाऱ्या खासदार नवनीत राणा यांनी एक व्हीडिओ शेअर केला आहे. या व्हीडिओमध्ये नवनीत राणा चक्क चुलीवर स्वयंपाक करताना दिसत आहेत. राणांचा हा व्हीडिओ काही लोकांना चांगलाच आवडला आहे. मात्र, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी राणा यांच्या याच व्हीडिओचा आधार घेत केंद्र सरकार, भाजप आणि नवनीत राणा यांच्यावर निशाणा साधला आहे. गॅस महाग झाल्यामुळे नवनीत राणा यांना गॅस ऐवजी चुलीवर स्वयंपाक करावा लागत आहे, अशी खोचक टीका रुपाली चाकणकर यांनी केली.
रुपाली चाकणकर यांनी, गॅस महाग झाल्यामुळे नवनीत राणा यांना गॅस ऐवजी चुलीवर स्वयंपाक करावा लागत आहे. मोदीजी तुमच्या राज्यात खासदार पण महागाईमुळे गॅस ऐवजी चूल वापरायला लागले आहेत. व्वा! मोदीजी व्वा!, अशा शब्दात निशाणा साधला आहे.
गॅस महाग झाल्यामुळे खा.
नवनीत राणा यांना गॅस ऐवजी चुलीवर स्वयंपाक करावा लागत आहे. मोदीजी तुमच्या राज्यात खासदार पण महागाईमुळे गॅस ऐवजी चूल वापरायला लागले आहेत. व्वा! मोदीजी व्वा!#गॅस_दरवाढ https://t.co/zA7Ci6eI6G— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) August 2, 2021
नवनीत राणा या सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. मदतारसंघातील पाहणी किंवा विविध कार्यक्रमांचे फोटो, व्हीडिओ त्या सोशल मीडियावर अफलोड करत असतात. त्यांच्या प्रत्येक फोटोची आणि व्हीडिओची चर्चा होते. मात्र, राणा यांच्या या व्हीडिओवर अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. काही नेटकऱ्यांनी नवनीत राणांचा हा व्हीडिओ म्हणजे गॅस दरवाढीचा निषेध असल्याची टीका केली. तर काहींनी केंद्र सरकारची उज्ज्वला गॅस योजना अपयशी ठरल्याची कमेंट करत नवनीत राणांना ट्रोल केलं.
दरम्यान, नवनीत राणा दर शनिवार-रविवारी आपल्या अंजनगावाला भेट देतात. तिथल्या शेतातल्या मुक्कामादरम्यान त्यांनी चुलीवर स्वयंपाक केला होता.




