राजकारण

मोदींकडून महाराष्ट्राचे कौतुक, दुसरीकडे भाजप नेत्यांचा महाराष्ट्र द्वेष उघड : चाकणकर

मुंबई : राज्यात कोरोना प्रतिबंधक लसींचा तुटवडा जाणवत आहे. राज्य सरकार या मुद्द्यावरुन केंद्र सरकारकडे बोट दाखवत आहे. तर भाजप नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी हा तुटवडा ठाकरे सरकारकडून जाणुनबुजून तयार केला जातोय, असा आरोप केला आहे. केद्र सरकारने लसींचा मुबलक साठा पाठवला असून ठाकरे सरकार तुटवजा निर्माण करतंय, असा गंभीर आरोप त्यांनी केला. त्यांच्या या आरोपांना राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्विटरवर जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच दरेकर यांना महाराष्ट्र द्वेषाने पछाडलं असल्याचा घणाघात त्यांनी केला आहे.

एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी महाराष्ट्राचं कौतुक करत आहेत. आज नीती आयोगाच्या अध्यक्षांनी देशभरात यशस्वी ठरत असलेल्या मुंबई मॉडेलचं कौतुक केलं आहे. तर दुसरीकडे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना महाराष्ट्र द्वेषाने एवढं पछाडलं आहे की, त्यांना काय आरोप करावे याचं सुद्धा भान राहिलेलं नाहीये. अशी वक्तव्ये करून तुम्ही पंतप्रधान मोदीजींचा अपमान करताय, असं रुपाली चाकणकर म्हणाल्या.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी कालच्या एका भाषणात अशा प्रकारचं गलिच्छ राजकारण करणाऱ्या भाजप नेत्यांची चांगलीच कानउघडणी केली आहे. ते भाषण अजून तुमच्यापर्यंत आलेले दिसत नाही. वाटल्यास त्याची लिंक आम्ही तुम्हाला देऊ शकतो, असा टोला चाकणकरांनी लगावला.

प्रवीण दरेकर यांनी केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला लसींचा अपेक्षित पुरवठा होत नसल्याचे सर्व आरोप फेटाळून लावले. एकीकडे राज्य सरकार महाराष्ट्राने सर्वाधिक लसीकरण केल्याचा दावा करते. ३० लाख नागरिकांना लसीचे दोन्ही डोस मिळाल्याचे सांगते. मग या लसी केंद्र सरकारने दिल्याशिवाय मिळाल्या का? असा सवाल प्रविण दरेकर यांनी विचारला. तसेच ‘दूध का दूध, पानी का पानी’ करण्यासाठी राज्य सरकारने आजपर्यंत केंद्राकडून आलेली मदत आणि त्यांनी नागरिकांना उपलब्ध करुन दिलेल्या सुविधा या दोन गोष्टींची श्वेतपत्रिका काढावी, असे आव्हान दरेकर यांनी दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button