राजकारण

निवृत्त न्यायमूर्ती व्ही.एम. कानडे नवे लोकायुक्त; बुधवारी शपथ घेणार

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सल्ल्यानुसार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश व्ही.एम. कानडे यांची नवीन लोकायुक्त म्हणून नियुक्ती करण्यास मंजुरी दिली आहे. त्यानंतर आता न्या. कानडे यांची शपथ बुधवारी होणार आहे. मागील वर्षभर महाराष्ट्राला पूर्णवेळ लोकायुक्त नसल्यामुळे, आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना गेल्या आठवड्यात पत्र लिहून राज्य सरकारला नियुक्तीचे निर्देश देण्याची विनंती केली होती. मागील लोकायुक्त, (निवृत्त) न्यायमूर्ती एमएल तहलियानी यांनी ऑगस्ट २०२० मध्ये आपला कार्यकाळ पूर्ण केला होता.

लोकायुक्त हे वॉचडॉगसारखे काम करतात आणि भ्रष्टाचाराविरोधात लढण्यात आणि पारदर्शकता आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. लोकायुक्त नसल्याने जवळपास एक वर्ष झाले आहे आणि हे स्पष्ट करते की सरकार पारदर्शकतेला प्रोत्साहन देण्यास उत्सुक नाही. सरकारवर नियंत्रण ठेवण्यासाठी लोकायुक्त पद महत्वाचे आहे आणि २०१५ ते २०२० दरम्यान सामान्य माणसासाठी एक चांगला पर्याय बनले आहे, असं गलगली यांचे म्हणणे आहे. लोकायुक्त भ्रष्टाचारविरोधी प्रकरणासाठी महत्वाचे पद आहे. नागरिक कोणत्याही सरकारी अधिकारी किंवा निवडून आलेल्या प्रतिनिधीविरोधात भ्रष्टाचाराच्या तक्रारी थेट लोकायुक्तांकडे करू शकतात, ज्यांच्याकडे जलद निवारणाचे काम आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button