आरोग्य

महाराष्ट्रात एका दिवसात ‘रेकॉर्ड ब्रेक’ लसीकरण; १४ लाख ३९ हजार ८०९ लोकांना लस

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र राज्य कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत रेकॉर्ड ब्रेक करत आहे. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी राज्य सरकार सज्ज झालं असून त्यासाठी लसीकरण मोहीम अधिक वेगानं सुरु केली आहे. बुधवारी पुन्हा एकदा राज्यानं लसीकरण मोहिमेत रेकॉर्ड ब्रेक केला आहे. बुधवारी रात्री ८ वाजेपर्यंत १४ लाख ३९ हजार ८०९ नागरिकांना लस देण्यात आली.

या लसीकरण मोहिमेत आतापर्यंत देण्यात आलेल्या एकूण डोसेसची संख्या ६ कोटी ५५ लाखांवर गेली आहे. तर देशात सर्वाधिक १ कोटी ७९ लाख नागरिकांना लसीचा दुसरा डोस देऊन महाराष्ट्र राज्यानं देशात रेकॉर्ड केला आहे.

देशात महाराष्ट्र राज्य अव्वल

राज्यात आजपर्यंत एकूण ६ कोटी ५५ लाख २० हजार ५६० लसींचे डोस देण्यात आलेत. त्यात सर्वाधिक १ कोटी ७९ लाख ७८ हजार ८०५ नागरिकांना लसीचा दुसरा डोस दिला आहे. यामुळे देशात राज्य लसीकरणाच्या मोहिमेत पहिल्या क्रमांकावर आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button