आरोग्य

राज्यात कोरोनाचा पुन्हा मोठा फैलाव ! ६३,३०९ नवे रुग्ण; ९८५ रुग्णांचा मृत्यू

मुंबई: राज्यात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात पसरलेला असून, बाधितांची संख्याही दिवसागणिक वाढत चाललीय. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात लॉकडाऊनही करण्यात आलाय. परंतु तरीही रुग्ण संख्या दिवसागणिक वाढत चाललीय. राज्यात दररोज ६० हजारांहून अधिक रुग्ण सापडत आहेत. बुधवारीही राज्यात ६३,३०९ नव्या रुग्णांची नोंद झाली. राज्यात बुधवारी एकूण ६,७३,४८१ सक्रिय रुग्ण आहेत. विशेष म्हणजे राज्यात आज ९८५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झालीय, सध्या राज्यातील मृत्यूदर १.५% एवढा आहे.

राज्यात आज ६३,३०९ नव्या रुग्णांची नोंद झाल्यानंतर कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ४४,७३,३९४ झालीय. राज्यात आज ६२,१८१ रुग्ण बरे होऊन घरी गेलेत, राज्यात आजमितीस एकूण ३७,३०,७२९ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेलेत. तपासण्यात आलेल्या २,६५,२७,८६२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४४,७३,३९४ (१६.८६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आलेत. सध्या राज्यात ४२,०३,५४७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत, तर ३१,१५९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button