अर्थ-उद्योग

किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेडच्या (केबीएल) सह-व्यवस्थापकीय संचालकपदी रमा किर्लोस्कर

पुणे : किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेडच्या (केबीएल) सह-व्यवस्थापकीय संचालकपदी रमा किर्लोस्कर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रमा किर्लोस्कर या किर्लोस्कर कुटुंबातील पाचव्या पीढीतील उद्योजिका आहेत. तसंच त्या किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेडचे अध्यक्ष संजय किर्लोस्कर यांच्या कन्या आहेत.

किर्लोस्कर ब्रदर्स लिमिडेटकडून ३ ऑगस्ट रोजी रमा किर्लोस्कर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्या डोमेस्टीक स्मॉल पंप्स विभाग व्हॉल्व्ह बिझनेसचं नेतृत्व करणार असल्याचं कंपनीनं नियामकाला सांगितलं. रमा किर्लोस्कर या किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेडचे अध्यक्ष संजय किर्लोस्कर यांच्या कन्या आहेत. त्यांच्याकडे सध्या किर्लोस्कर इबारा पंप्स लिमिटेडच्या (केईपीएल) व्यवस्थापकीय संचालकपदाची जबाबदारी आहे. केईपीएल ही जपानची इबारा कॉर्पोरेशन आणि किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड यांचं जॉईंट व्हेन्चर आहे.

केबीएल बोर्डाचे संचालक आणि किर्लोस्कर ब्रदर्स इंटरनॅशनल बीव्हीचे (ज्यात एसपीपी पंप लिमिटेड यांचा समावेश आहे) मुख्य कार्यकारी अधिकारी आलोक किर्लोस्कर सर्व परदेशी व्यवसायांचे नेतृत्व करत आहेत आणि कंपनीमध्ये अनेक तंत्रज्ञान उपक्रमांचे नेतृत्व करत असल्याचं केबीएलने आपल्या नियामक फाईलिंगमध्ये नमूद केलं आहे. या बदलामुळे, किर्लोस्कर कुटुंबाची पाचवी पिढी आता देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कंपनीच्या वाढीचा प्रवास सुरू ठेवण्यासाठी रणनीतिकदृष्ट्या महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी सांभाळत आहे. हे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट कंपनीकडून उत्पादन कंपनी बनवण्याच्या मोठ्या बदलांशी सुसंगत आहे, असंही कंपनीनं फायलिंगमध्ये नमूद केलं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button