Top Newsराजकारण

मी एका शहिदाचा मुलगा, अपमान सहन करणार नाही; राहुल गांधींची टीका

नवी दिल्ली: गेल्या काही कालावधीपासून काँग्रेस सातत्याने केंद्रातील मोदी सरकारवर टीका करताना पाहायला मिळत आहे. काँग्रेस नेते आणि आमदार राहुल गांधी अनेकविध विषयांवरून पंतप्रधाननरेंद्र मोदी, केंद्र सरकार आणि भाजपवर निशाणा साधताना दिसत आहेत. ब्रिटीश राजवटीच्या क्रूरतेचे प्रतिक असलेल्या जालियनवाला बागचे मोदी सरकारकडून नुतनीकरण करण्यात आले असून, राजकीय क्षेत्रासहीत इतिहास तज्ज्ञांकडून यावर टीका करण्यात येते आहे. या अभद्र क्रूरतेच्या आम्ही विरोधात आहोत, या शब्दांत राहुल गांधी यांनी मोदी सरकारला फटकारले आहे.

सुमारे १०० वर्षांपूर्वी ब्रिटिश राजवटीने घडवून आणलेले जालियनवाला बाग सामूहिक हत्याकांड इतिहासातील एक काळा अध्याय असल्याचे मानले जाते. नुतनीकरणाच्या माध्यमातून शहिदस्थळाला आधुनिक रंग फासण्याचा प्रयत्न केल्याची टीका सोशल मीडियातून व्यक्त होते. अनेकांनी यावरून मोदी सरकारवर सुनावले असून, राहुल गांधी यांनी एक ट्विट करत टीका केली आहे.

ज्यांना हौतात्म्याचा अर्थ कळत नाही, तेच केवळ जालियनवाला बाग शहिदांचा अपमान करू शकतात. मी एका शहिदाचा मुलगा आहे. कोणत्याही किमतीत आणि काही झाले तरी शहिदांचा अपमान सहन करणार नाही. या अभद्र क्रूरतेच्या आम्ही विरोधात आहोत, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे. हे स्मारकांचे कॉर्पोरेटीकरण आहे. जिथे ही स्मारके आधुनिक संरचनांच्या रुपात संपुष्टात येतात आणि आपले वारसा मूल्य हरवतात, असे इतिहासकार एस इरफान हबीब यांनी म्हटले आहे.

दरम्यान, गेल्या शनिवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी जालियनवाला बागेतील नव्या स्मारकाचे उद्घाटन केले. या घटना दाखवण्यासाठी ऑडिओ-व्हिडिओ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मॅपिंग आणि थ्रीडी चित्रणासोबत कला आणि मूर्तीकलांचाही समावेश करण्यात आला आहे. तसेच घटना समोर उभी करण्यासाठी साऊंड आणि लाईट शोची व्यवस्था करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button