अर्थ-उद्योग

क्विक हील टेक्नॉलॉजीला दुसऱ्या तिमाहीत मोठा लाभ

मुंबई : ग्राहक, व्यावसाय आणि सरकारला सायबर सुरक्षा आणि डेटा संरक्षण उपाय पुरवणारी अग्रगण्य कंपनी क्विक हील टेक्नॉलॉजीजने ३० सप्टेंबर २०२१ ला संपलेल्या तिमाही आणि अर्धवार्षिकसाठी आपले अलेखापरीक्षीत निकाल जाहीर केले आहे. कंपनीने या तिमाहीत मजबूत महसूल आणि भरघोस नफ्याची कमाई केली आहे. यासोबतच कंपनीने रिटेल, व्यवसाय आणि शासन श्रेणीत आपली स्थिती आणखी भरभक्कम केली आहे.

कंपनीचा महसूल २३% वाढून १,०३८ दशलक्ष रुपयांवर पोहोचला आहे. कंपनीने ईबीटीडीएमध्ये १८.५ % टक्क्यांची वार्षिक वृद्धी घेतली आहे. आर्थिक वर्ष २०२१च्या दुस-या तिमाहीच्या रु. ३९१ दशलक्षच्या तुलनेत यावर्षीच्या दुस-या तिमाहीत ते रु. ४६३ दशलक्ष झाले आहे. आर्थिक वर्ष २०२२ च्या दुस-या तिमाहीत कंपनीचे ईबीटीडीए मार्जिन (निव्वळ उत्पन्नाच्या % नुसार) ४४.६ % वर स्थिर राहिले आहे. कंपनीचा कर पश्चात नफा गतवर्षीच्या दुस-या तिमाहीच्या रु. २८८ दशलक्षच्या तुलनेत वार्षिक २०.१% वृद्धीसह यावर्षीच्या दुस-या तिमाहीत रु. ३४६ दशलक्ष झाला आहे.

क्विक हील टेक्नॉलॉजीज लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलाश काटकर म्हणाले, “महसूल, नफात्मकता आणि रोकडतेचा प्रवाह निर्माण करण्याबाबत यंदाच्या तिमाहीत आम्ही अष्टपैलू आणि तडाखेबंद कामगिरी केली आहे. तसेच मजबूत आर्थिक परिप्रेक्ष्य सायबर सुरक्षेच्या क्षेत्रात आमची धोरणात्मक रणनीती आणि आमच्या सेवांचे सामर्थ्य प्रदर्शित करत आहे. कोविडमुळे आलेल्या व्यवधानांच्या सर्व आव्हानांनंतरही आम्ही रिटेल, उद्यम आणि सरकारी अशा दोन्ही श्रेणींत मजबूत कामगिरीसोबतच आमच्या कार्यक्षमतेचेही प्रदर्शन केले आहे.”

ते पुढे म्हणाले की, “गेल्या काही तिमाहींपासून आम्ही उद्यम श्रेणीत सातत्याने दुहेरी आकड्यांतील वृद्धिदर साधण्यात यशस्वी ठरलो आहोत. बाजारपेठेतील आपला हिस्सा वाढवण्याच्या आमच्या रणनीतीनुसार आम्ही संशोधन आणि विकासात (रिसर्च अँड डेव्हलपमेंट) भरीव गुंतवणूक करत राहणार आहोत. तसेच आगामी तिमाहींत नव्या पीढीतील सेवा-समाधान लाँच करण्यासाठी आमच्या नेतृत्व टीमचे बळकटीकरण करणार आहोत.”

या तिमाहीतील ठळक अपडेट्स :

– क्विक हीलने जागतिक उद्योग क्षेत्रातील दिग्गज व्यक्ती रिचर्ड स्टाइनॉन यांची आपल्या संचालक मंडळावर नियुक्ती केली आहे. सायबर सुरक्षा क्षेत्रातील त्यांच्या व्यापक अनुभवाचा उपयोग क्विक हीलला नव्या पीढीतील अत्याधुनिक उत्पादने आणि सेवांच्या निर्मितीसाठी होणार आहे.

– क्विक हीलने आपल्या फ्लॅगशिप उत्पादनांच्या नव्या आवृत्त्या सादर केल्या आहेत. याद्वारे ग्राहकांना #FreedomWithPrivacy चा अनुभव घेता येणार आहे.

– जर्मनीतील प्रतिष्टित एव्ही-टेस्ट इन्स्टिट्यूटने क्विक हीलचा ब्रँड सेक्राइटला (Seqrite) उच्च दर्जाचे सुरक्षितता उत्पादन म्हणून प्रमाणित केले आहे. संरक्षण, कामगिरी आणि उपयोगिता आणि निकषांवर सेक्राइटला संपूर्ण गुण देण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button