माहिती खात्यातील अधिकाऱ्यांच्या इस्रायल दौऱ्यावर प्रश्नचिन्ह
मुंबई : विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्तासंघर्ष सुरू असताना पाच अधिकारी इस्त्रायलच्या दौऱ्यावर गेले होते. काही दिवसांपूर्वी कथित पेगासस फोन टॅपिंगचा गौप्यस्फोट झाल्याने हे अधिकारी नेमक्या याच काळात इस्त्रायलला का गेले होते? या मागे तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारचा काही हेतू नव्हता ना, असा संशय व्यक्त करण्यात आला होता. यामुळे ठाकरे सरकारने याची माहिती मागविली होती.
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांचा इस्रायल दौरा शेती आणि तंत्रज्ञान याबाबतची माहिती घेण्यासाठी होता, असे म्हटले होते. मात्र, हा दौरा शेतीसंबंधी कामांसाठी नव्हता, तर दुसऱ्याच कामांसाठी होता अशी माहिती समोर आली आहे. या दौऱ्याबाबत प्रश्नांची वावटळ उठताच फडणवीसांच्या कार्यालयाकडून पुन्हा याबाबत स्पष्टीकरण देण्यात आले आहे. “डीजीआयपीआरचा इस्त्रायल दौरा हा मीडियातील बेस्ट प्रॅक्टिसेसच्या अभ्यासासंदर्भात होता. हा दौरा १६ नोव्हेंबर २०१९ रोजी सुरू झाला. त्यामुळे तो राज्यात सरकार अस्तित्त्वात नसतानाच्या काळात झाला होता. काल यासंदर्भात प्रतिक्रिया देताना राज्यात कृषी विभागातर्फे शेतकर्यांचे इस्त्रायल दौरे नेहमी आयोजित केले जातात, तसाच हा दौरा डीजीआयपीआरतर्फे मीडिया बेस्ट प्रॅक्टिसेसच्या अभ्यासासंदर्भात होता, असेच देवेंद्र फडणवीस यांना सांगायचे होते”, असे त्यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले.
गेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर राज्यात सत्तासंघर्ष सुरू झाला. एकत्र निवडणूक लढलेल्या भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेला बहुमत मिळालं. मात्र मुख्यमंत्रिपदावरून शिवसेना आणि भाजपमध्ये संघर्ष झाला. ख्यमंत्रिपदाचा शब्द भाजप पाळत नसल्याची भूमिका शिवसेनेनं घेतली. तर तसा कोणताही शब्द दिलाच नसल्याचं भाजपचं म्हणणं होतं. यावरून शिवसेना आणि भाजपची युती तुटली. शिवसेनेनं थेट काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत जात सत्ता स्थापन केली. गासस स्पायवेअरच्या माध्यमातून अनेक केंद्रीय मंत्री, न्यायमूर्ती आणि पत्रकारांबद्दलची गोपनीय तपशील त्यांच्या फोनमधून गोळा करण्यात येत असल्याची माहिती समोर आल्यानं देशात खळबळ उडाली आहे. पेगासस यंत्रणा इस्रायलची आहे. राज्यात सत्तासंघर्ष सुरू असताना ५ अधिकारी इस्रायलच्याच दौऱ्यावर गेले होते. त्यामुळे संशय वाढला आहे.
आता हे अधिकारी तिकडे नेमके काय करायला गेले होते, ते समोर आले आहे. सरकारमधील जनसंपर्काचे नवीन ट्रेंड्स काय ते समजून घेणे, वेब मिडीया वापराच्या नव्या मार्गाचा अभ्यास, सायबर गुन्हे याबद्दल जागृती कशी करावी, अशा काही गोष्टींचा समावेश आहे. सरकारमधील जनसंपर्काचे नवीन ट्रेंड्स काय ते समजून घेणे. वेब मिडीया वापराच्या नव्या मार्गाचा अभ्यास करणे. डिजीटल मार्केटिंग टूलच्या वापरासंबंधी माहिती मिळवणे. सरकारसाठी चांगला मिडीया प्लॅन तयार करण्याचं नवं तंत्र आत्मसात करणे. स्मार्ट सिटीमध्ये सरकारी जनसंपर्काचा वापर कसा करावा. लोकांमध्ये सायबर गुन्ह्य़ांबद्दल जागृती कशी करावी. पर्यटनात जनसंपर्काचा वापर प्रभावीपणे कसा व्हावा. नवीन माध्यमाचा ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न कसा करावा. नवनव्या येणाऱ्या माध्यमांच्या वापरा संदर्भात अभ्यास करणे आणि आपत्कालीन परिस्थितीत माध्यमांचा वापर कसा करावा यासाठी हा दौरा होता हे आता स्पष्ट झाले आहे.