Top Newsराजकारण

राष्ट्रवादीच्या आमदाराला वेसण घाला, नाहीतर…; संजय राऊतांचा थेट अजित पवारांना इशारा

खेड : गेल्या काही दिवसांपासून खेड पंचायत समितीतील राजकारण चांगलेच तापले आहे. तीन पक्षांमध्ये योग्य समन्वय आहे. वरिष्ठ नेते कुठेही गालबोट लागू देत नाहीत. मात्र गेल्या काही दिवसांपासून खेडमध्ये मात्र राजकीय कुरघोडीच्या वारंवार घटना घडत आहे. तसेच खेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराने घाणेरडं राजकारण केले. अजितदादा, तुमच्या आमदाराला वेसण घाला, नाहीतर पुढच्या वेळी महाविकास आघाडी राहू अगर नको राहू खेडमध्ये शिवसेनेचाच आमदार असेल अशा शब्दात गर्भित इशारा दिला आहे.

शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी थेट खेड गाठत राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला. याचवेळी त्यांनी खेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटलांवर टीकेची झोड उठवली आहे. तसेच आम्ही देखील फोडाफोडी करू शकतो. खेडच्या आमदाराची वागण्याची पद्धत हीच राहिली तर पुढच्या वेळी महाविकास आघाडी राहू अगर नको राहू खेडमध्ये शिवसेनेचाच आमदार असेल, असंं राऊत म्हणाले.

संजय राऊत यांनी खेडमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी स्थानिक कुरघोडीच्या राजकारणासह विविध मुद्द्यांवर भाष्य केले. राऊत म्हणाले, महाराष्ट्रात सगळीकडे सुरळीत सुरू असताना असे खेड तालुक्यात कुरघोडी होत असेल तर पालकमंत्री अजित पवार यांनी विचार केला पाहिजे. खेडच्या आमदारांना त्यांनी वेसण घालण्याची गरज आहे. तसेच महाविकास आघाडी सरकारमधील तीन पक्षांमध्ये योग्य समन्वय आहे. वरिष्ठ नेते कुठेही गालबोट लागू देत नाहीत. मात्र गेल्या काही दिवसांपासून खेडमध्ये मात्र राजकीय कुरघोडीच्या वारंवार घटना घडत आहेत. दोन-तीन पक्ष असल्यामुळे भांड्याला भांडं लागते. एकमेकांची माणसं फोडून कुठेही सत्ता स्थापन करायची नाही, असं अलिखित करार असेल तर दोन पक्षांनी महिती देऊन समन्वय साधला पाहिजे, असं राऊत म्हणाले.

खेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराने घाणेरडं राजकारण केले. शरद पवारांच्या पक्षात राजकारण करण्यासाठी ते लायकीचे नाही. पंचायत समितीच्या जागेवरून आमदार राजकारण करत आहेत, ते परंपरेला धरून नाही. अजितदादांना सांगून सुद्धा हे रेटून नेत असतील तर ह्याला माज आला असं म्हणतात. पंचायत समितीच्या सदस्यांना पैशांच्या अमिषाने पळवून नेले. हा विषय लवकरच आम्ही त्यांच्या प्रमुखांना कळवू, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.

खेड पंचायत समितीचे शिवसेनेचे सभापती भगवान पोखरकर यांच्या विरोधात दाखल केेलेला अविश्वास ठराव ११ विरुध्द ३ अशा मतांनी मंजूर झाला. २४ मे ला सभापतीविरूध्द शिवसेनेच्या सहा सदस्यांनी बंड पुकारून हा अविश्वास ठराव दाखल केला होता. त्याला राष्ट्रवादी व भाजप सदस्यांनी साथ दिली. या घटनेबाबत खेडचे राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटील व शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांच्यामध्ये आरोप प्रत्याआरोपांची जुगलबंदी रंगली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button