Top Newsराजकारण

नवज्योत सिंग सिद्धूवर आरोप करत पंजाब काँग्रेसच्या प्रवक्त्याचा राजीनामा

कॅप्टन अमरिंदर सिंग भाजप अन् ढिंडसा यांच्यासोबत निवडणूक लढणार

नवी दिल्ली : पंजाब काँग्रेसमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा समोर आला आहे. पंजाब काँग्रेसचे प्रवक्ते प्रितपाल सिंग बलियावाल यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा देताना पक्षाची पंजाब युनिटची कमांड चुकीच्या हातात असल्याचं कारण त्यांनी दिलं आहेत. तसेच बलियावाल हे हरयाणा, हिमाचल प्रदेश काँग्रेसचे राष्ट्रीय समन्वयक आणि पंजाब काँग्रेसचे वरिष्ठ मीडिया विश्लेषक देखील होते. सोनिया गांधी यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा पाठवला असून त्यामध्ये नवज्योत सिंग सिद्धू यांच्यासोबत काम करणं शक्य नसल्याचं म्हटलं आहे.

बलियावाल यांनी राजीनामा पत्रात प्रवक्ता म्हणून पाकिस्तानशी संबंधांबद्दल मूर्खपणाची, पक्षविरोधी आणि सरकारविरोधी वक्तव्ये आणि विधाने यांचे समर्थन करणे माझ्यासाठी खूप कठीण झाले आहे” असं म्हटलं आहे. तसेच “पक्षाने संघटन मजबूत करण्यासाठी विविध व्यासपीठांवर दिलेल्या जबाबदाऱ्यांचा मी सन्मान केला आहे. मात्र, आता पक्षाने पंजाबची कमान चुकीच्या हातात दिली आहेत, असं देखील प्रितपाल सिंग बलियावाल यांनी म्हटलं आहे.

नवज्योत सिंग सिद्धू यांनी पाकिस्तानशी संबंधांसह मूर्खपणाची, पक्षविरोधी, सरकारविरोधी केलेल्या वक्तव्याचा प्रवक्ता म्हणून बचाव करणे खूप कठीण झाले आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग आणि सुनील कुमार जाखड यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करण्याची आपल्या पक्षाची क्षमता होती. मुख्यमंत्री चरनजीत सिंग चन्नी पक्षाची प्रतिमा चांगली करण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु तुम्ही सिद्धूची प्रवक्तेपदासाठी निवड करण्याचा निर्णय घेतला. मात्र रोज सिद्धू नवनवीन ट्वीट करून मुख्यमंत्र्यांचं महत्त्व कमी करत आहेत.

अकाली राजवटीतही त्यांनी माझ्या कुटुंबावर खोटे गुन्हे दाखल केले गेले आणि माझा व्यवसाय उद्ध्वस्त केला, पण तरीही आम्ही काँग्रेसच्या पाठीशी उभे राहिलो. पक्षाने जगदीश टायटलर यांना महत्वाचं पद दिल्याने मी पुन्हा दुखावला गेलो. म्हणून, मी राष्ट्रीय समन्वयक, हरियाणा आणि हिमाचल प्रदेश किसान काँग्रेसच्या प्रभारी आणि पंजाब काँग्रेसच्या वरिष्ठ मीडिया पॅनेलच्या जबाबदारीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे, असं बलियावाल यांनी म्हटलं आहे.

कॅप्टन अमरिंदर सिंग भाजप अन् ढिंडसा यांच्यासोबत निवडणूक लढणार

आगामी पंजाब विधानसभा निवडणुकीसंदर्भात कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी सोमवारी मोठी घोषणा केली. त्यांचा पक्ष पंजाब लोक काँग्रेस, भारतीय जनता पक्ष आणि अकाली दलाविरोधात बंड करणाऱ्या ढिंडसा यांच्या पक्षासोबत एकत्रितपणे विधानसभा निवडणूक लढवेल, असे सिंग यांनी म्हटले आहे. ते चंदीगड येथे पत्रकारांशी बोलत होते. अमरिंदर सिंग यांनी काही दिवसांपूर्वी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचा राजिनामा दिला होता. याच बरोबर त्यांनी नव्या पक्षासोबत पंजाब विधानसभा निवडणुकीत उतरण्याचीही घोषणा केली होती.

भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांच्यानंतर, कॅप्टन अमरिंदर सिंग यांनीही आता यासंदर्भात घोषणा केली आहे की, ते भाजपसोबत निवडणूक लढवतील. तसेच, सुखदेव सिंग ढिंडसा यांचा विचार करता, त्यांनी अद्याप आपले पत्ते ओपन केलेले नाहीत. सर्वात महत्वाची गोष्ठ म्हणजे, अमरिंदर सिंग हे ज्या भाजपवर गेल्या २५ वर्षांपर्यंत निशाणा साधत होते, आज त्यांनी त्यांच्यासोबतच निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, पक्षीय पातळीवर कोणतीही चर्चा झाली नसली तरी गृहमंत्री आणि पंतप्रधानांशी याबाबत बोलणी झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. अशा स्थितीत कॅप्टन आता भारतीय जनता पक्षाच्या खांद्याला खांदा लावून काँग्रेसच्या विरोधात निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. यासोबतच अमरिंदर सिंग विजयाचा दावाही करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button