राजकारण

सुनील माने यांना १३ मे पर्यंत न्यायलयीन कोठडी; कारागृहात संरक्षण देण्याचे आदेश

मुंबई : उद्योजक मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेचे निलंबित पोलीस निरीक्षक सुनील माने यांना अटक करण्यात आली आहे. सुनील माने यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने सुनील माने यांना १३ मे पर्यंत न्यायलयीन कोठडी सुनावली आहे. तसेच माने यांच्या कुटुंबाने त्यांच्या जीवितास धोका असल्याचा दावा केल्यानंतर न्यायालयाने सुनील माने यांना कारागृहात सुरक्षा पुरवण्याचे तोंडी आदेश दिले आहेत.

ठाणे येथील व्यापारी मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात निलंबित पोलीस अधिकारी सुनिल माने यांना मागील आठवड्यात अटक करण्यात आली. त्यांना आज न्यायालयात हजार करण्यात आले होते. यावेळी सुनील माने यांचे नातेवाईकसुद्धा न्यायालयात हजर होते. या नातेवाईकांनी निलंबित पोलीस निरीक्षक सुनील माने हे एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळखले जातात. त्यांनी त्यांच्या कर्तव्यादरम्यान अनेक गुंडावर कारवाई केली आहे. त्यामुळे कारागृहात गेल्यावर गुंडांकडून धोका असल्याचा दावा केला. त्यानंतर ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आली. त्यावर सुनील यांना कोठडीमध्ये संरक्षण द्यावं, असे तोंडी आदेश न्यायालयाने दिले.

ठाणे येथील व्यापारी मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणात निलंबित पोलीस निरक्षक सुनील माने यांचासुद्धा सहभाग असल्याचा संशय एनआयएला आहे. मनसुख हिरेन यांना ४ मार्च रोजी रात्री एका व्यक्तीने फोन केला. यावेळी आपण कांदिवली गुन्हे शाखेतून तावडे बोलतोय असे हिरेन यांना सांगण्यात आले. तसेच उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ जी तुमची गाडी सापडली होती; त्याबाबत तुमच्याशी बोलायचं आहे, अस सांगून मनसुख यांना घोडबंदर रोड येथे बोलावण्यात आलं होतं. मनसुख हिरेन तिथे आल्यावर त्यांना ताब्यात घेऊन ठार मारण्यात आलं. त्यानंतर त्यांचा मृतदेह कळवा खाडीत टाकण्यात आला होता, असे एनआयएचे म्हणणे आहे. तसेच या सर्व कटात सुनील माने यांचासुद्धा सहभाग असल्याचा संशय एनआयएला आहे. याच कारणामुळे सुनील माने यांना मागील आठवड्यात आठवड्यात अटक करण्यात आली.

मनसुख हिरेन यांना तावडे नावाने जो फोन आला होता. तो सुनील माने यांनीच केला होता, असं एनआयएच्या सूत्रांच म्हणणं आहे. त्याप्रमाणे मनसुख यांचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी सात ते आठ जण कळवा खाडी येथे गेले होते. त्या आठ जणांत सुनील माने हेसुद्धा होते, असं एनआयएच्या सूत्रांच म्हणणं आहे.

दरम्यान, सुनील माने हे १९९५ च्या बॅचचे अधिकारी आहे. सुनील सध्या मुंबई क्राईम ब्रांचच्या कांदिवली युनिट येथे इंचार्ज पोलीस निरीक्षक होते. परमबीर सिंग मुंबईचे पोलीस आयुक्त झाल्यानंतर सुनील यांच्यावर युनिट ११ ची जबाबदारी सोपविण्यात आली होती. सुनील माने हे परमबीर सिंग यांच्या जवळच्या वर्तुळातील अधिकारी म्हणून ओळखले जातात. याच कारणामुळे जेव्हा जेव्हा महत्वाची कामगिरी असेल तेव्हा सुनील हे सक्रिय असायचे. सध्या ते न्यांची न्यायलयीन कोठडी १३ मे पर्यंत वाढवली असून त्यांना संरक्षण पुरवण्याचे तोंडी आदेश न्यायालयाने दिले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button