भाजपा राज में चुनाव तक बस "अच्छे दिनों" का झांसा है।
चुनाव खत्म होते ही महंगे दिन जनता के लिए परेशानी का सबब बनेंगे। अप्रैल से रसोई गैस की कीमत दोगुनी हो सकती है, बढ़ेंगे पेट्रोल-डीजल के दाम।
सरकार के पास महंगाई रोकने का कुछ भी नहीं है इंतजाम।
श्रीमती @priyankagandhi pic.twitter.com/2Z4RQteAod
— Youth Congress (@IYC) February 22, 2022
नवी दिल्ली : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीची चौथ्या टप्प्याची रणधुमाळी सुरु आहे. प्रियंका गांधी वड्रा आणि अखिलेश यादव प्रचारादरम्यान समोर आल्याचं यापूर्वी दिसून आलं होतं. प्रचारादरम्यान प्रियंका गांधी आणि भाजप कार्यकर्ते समोरासमोर आले. यावेळी राजकारणात दुर्मिळ होत असलेलं चित्र पाहायला मिळालं. प्रियंका गांधी यांनी भाजप कार्यकर्त्यांशी हस्तोंदलन केलं. भाजप कार्यकर्त्यांनी देखील प्रियंका गांधी यांना प्रतिसाद दिला. प्रियंका गांधी यांनी यावेळी भाजप कार्यकर्त्यांना काँग्रेसचा जाहीरनामा दिला. भाजप कार्यकर्त्यांनी देखील ब्रेसलेट मागून घेतलं आहे. प्रियंका गांधी यांनी यावेळी महिला सुरक्षेच्या मुद्याला प्राधान्य दिलं आहे.
ये वीडियो यूपी के माहौल को स्पष्ट करने के लिए काफी है। pic.twitter.com/gNvJgDwDah
— Youth Congress (@IYC) February 22, 2022
प्रियंका गांधी यांच्यावर काँग्रेसकडून उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. उत्तर प्रदेशात प्रियंका गांधी यांनी महिला सुरक्षा आणि महिलांच्या प्रश्नांवर भर देणार जाहीरनामा तयार केला आहे. यूथ काँग्रेसकडून प्रियंका गांधी यांचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत प्रियंका गांधी आणि भाजप कार्यकर्ते समोरासमोर आलेले आहेत. प्रियंका गांधी गाडीत बसून काँग्रेसचा जाहीरनामा भाजपच्या कार्यकर्त्यांना देत आहेत. भाजपचे कार्यकर्ते प्रियंका गांधी यांच्याकडे बँडची मागणी करत आहेत. प्रियंका गांधी देखील त्यांची मागणी पूर्ण करताना दिसत आहेत.
उत्तर प्रदेश में बदल रहे हैं हालात, भाजपा समर्थक भी चल रहे हैं कांग्रेस के साथ।
कांग्रेस के हाथ पर जनता को विश्वास है।#BJPseUPbachao pic.twitter.com/IlEDBECGZJ
— Youth Congress (@IYC) February 22, 2022
दुसऱ्या एका व्हीडिओत प्रियंका गांधी गाडीतून बाहेर येऊन भाजप कार्यकर्त्यांशी हस्तोंदलन करताना दिसत आहेत. भाजप कार्यकर्ते देखील प्रियंका गांधी यांना प्रतिसाद देताना दिसत आहेत. एकूणचं भारतीय लोकशाहीतील दुर्मिळ होत असलेलं चित्र यानिमित्तानं दिसून आलं आहे.