राजकारण

शर्जिल उस्मानी पोलिसांत जबाब नोंदवून गेला तरी ठाकरे सरकारला पत्ता नाही!

सत्तेसाठी आणखी किती लोकांना वाचविणार; फडणवीसांचा सवाल

मुंबई : आपले मुख्यमंत्री विधानसभेत छातीठोकपणे म्हणाले, ‘शार्जिल उस्मानी जगाच्या कुठल्याही कोपर्‍यात असेल तर त्याच्या मुसक्या आवळून शोधून आणणार म्हणजे आणणारच’ प्रत्यक्षात काय, तो येऊन गेला, जबाब देऊन गेला आणि महाविकास आघाडी सरकारने प्रत्यक्षात काय केले. असा सवाल विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.

पुण्यातील एल्गार परिषदेत शर्जिल उस्मानीने हिंदू समजाविषयी गरळ ओकली होती. यानंतर विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली होती. शर्जिल उस्मानीविरोधात कारवाईचा बडगा चालवा असे मत विरोधकांनी व्यक्त केले होते. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सभागृहात शर्जिल उस्मानी कुठल्याही कोपऱ्यात असेल तर त्याच्या मुसक्या आवळून शोधूण आणणार असे म्हटले होते. परंतु शर्जिल उस्मानी गपचूप येऊन पुण्यातील पोलीस स्थानकात जबाब नोंदवून गेला तरी त्यावर कारवाई करण्यात आली नाही यावरुन विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.

फडणवीस यांनी ट्विट करत म्हटले आहे की, मूळ तक्रारीत भादंविचे २९५ अ कलम समाविष्ट असताना सुद्धा एखाद्या विशिष्ट धर्माला लक्ष्य करण्यासाठी लावले जाणारे हे कलम पद्धतशीरपणे एफआयआरमधून वगळले गेले. लावले ते कलम १५३ अ, जे विविध घटकांमध्ये शत्रूत्त्व निर्माण होईल, अशा विधानांसाठी लागते. खरे तर एफआयआर २९५ अ, १५३ अ या दोन्ही कलमांतर्गत असायला हवा होता. ‘न्यायव्यवस्था आणि सरकारी प्रशासन तंत्राविरोधात युद्ध पुकारण्यासाठी १२४ अ हे सुद्धा कलम लावायला हवे होते. पण, प्रत्यक्षात करताहेत जामीन मिळण्यासाठी मदत. अखेर सत्तेसाठी आणखी किती लोकांना वाचविणार मुख्यमंत्री उद्धवजी असे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

पुण्यातील एल्गार परिषदेत अलिगड मुस्लिम विद्यापीठाचा विद्यार्थी शार्जिल उस्मानीने वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. ‘हिंदू समाज आहा पूर्णपणे सडला आहे’ असं वक्तव्य त्याने केलं होतं. ‘हिंदुस्तान मे हिंदू समाज बुरी तरिकेसे सड चुका है’, शरजिल उस्मानी याचं हे विधान भारतीय दंडसंहितेच्या कलम क्रमांक 153A आणि 295A अनुसार गुन्हा ठरते, अशी तक्रार भाजपने पुणे पोलिसात केली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button