मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगा (एमपीएससी) मार्फत जानेवारी महिन्यात घेतल्या जाणाऱ्या तीन परीक्षांचे सुधारीत वेळापत्रक जाहीर झालं आहे. एमपीएससीच्या अधिकृत संकेतस्थळावर वेळापत्रक जारी करण्यात आलं आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. आता एमपीएससीमार्फत सुधारीत वेळापत्रक जारी करण्यात आलं आहे.
एमपीएससीमार्फत जानेवारी, २०२२ मध्ये नियोजित तीन परीक्षांच्या सुधारित दिनांकाबाबतचे प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. २ जानेवारी २०२२ रोजी होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२१ आता २३ जानेवारी रोजी हाणार आहे. महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा -२०२० संयुक्त पेपर क्रमांक १ आता २९ जानेवारीला होणार आहे. आधी ही परीक्षा २२ जानेवारी रोजी होणार होती. तर महाराष्ट्र दुय्यम सेवा परीक्षा २०२०, पेपर क्रमांक २, पोलिस उपनिरीक्षक परीक्षा आता ३० जानेवारी रोजी घेण्यात येणार आहे. ही परीक्षा २९ जानेवारी रोजी होणार होती.
आयोगामार्फत जानेवारी, २०२२ मध्ये नियोजित तीन परीक्षांच्या सुधारित दिनांकाबाबतचे प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. pic.twitter.com/J1dQq6qWRV
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) January 3, 2022
कोरोना विषाणूच्या पार्दुर्भाच्या संदर्भात शासनाकडून वेळोवेळी राबविण्यात येमाऱ्या उपाययोजना लक्षात घेऊन परीक्षेच्या आयोजानाच्या अनुषंगाने आयोदाकडून आढावा घेण्यात येईल. तसेच याबाबतची माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. याकरीता आयोगाच्या संकेतस्थळाचे नियमित अवलोकरन करणे उमेदरवारांच्या हिताचे राहील, असे एमपीएससीने जारीर केलेल्या प्रसिद्धिपत्रकात म्हटलेय.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) डिसेंबर २०२१ पर्यंतच्या राज्याच्या विविध विभागांकडून रिक्त जागांच्या माहिती मागवली होती. त्यानुसार राज्यात सात हतार ५६० जागा रिक्त असल्याचे निदर्शनास आले आहे. या जागा २०२२ मध्ये भरण्यात येतील. त्यामुळे या वर्षात ‘एमपीएससी’च्या विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी मिळणार आहे. राज्याच्या २५ विभागांमधील रिक्त असलेल्या पदांच्या संख्यानुसार राज्यात तिन्ही गटांच्या एकूण सात हजार ५६० जागा रिक्त आहेत. त्यामध्ये ‘अ’ गटातील १४९९, ‘ब’ गटातील १२४५ आणि ‘क’ गटातील १५८३ पदांचा समावेश आहे. या संदर्भातील सविस्तर रिक्त जागांची यादी ‘एमपीएससी’च्या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.