Top Newsराजकारण

लोकसभेत ८ व्या मिनिटालाच गदारोळ; कामकाज दुपारपर्यंत तहकूब

नवी दिल्ली : संसदेचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरु झालं आहे. १९ जुलै ते १३ ऑगस्टपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. अधिवेशनाच्या सुरुवातीला नव्या सदस्यांना शपथ देण्यात आली. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी नव्या मंत्र्यांचा परिचय देण्यासाठी उभे राहिले. त्यानंतर विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेत घोषणाबाजी सुरु केली. सभागृहाचं कामकाज सुरु झाल्यानंतर अवघ्या ८ मिनिटात विरोधकांनी गोंधळाला सुरुवात केली. त्यावर पंतप्रधान मोदी म्हणाले, काही लोकांना महिला, दलित आणि शेतकरी मंत्री झालेले बघवत नाही, त्यामुळेच विरोधक गोंधळ घालत आहेत.

मोदी म्हणाले, मला वाटलं आज सभागृहात उत्साहाचं वातावरण असेल. मोठ्या संख्येत महिला, दलित, आदिवासी, शेतकरी कुटुंबातील खासदार आता मंत्री झाल्याने आनंदाचं वातावरण असेल. त्यांचा परिचय करुन देणं आनंदाचं होतं, मात्र काहींना दलित, महिला, ओबीसी, शेतकरी पुत्र मंत्री झालेले रुचले नाही. त्यामुळेच त्यांनी परिचय करु दिला नाही. विरोधकांनी एकच गदारोळ सुरु केल्यामुळे, लोकसभा अध्यक्षांनी सभागृहाचं कामकाज पहिल्याच दिवशी, पहिल्याच सत्रात दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित केलं. तिकडे राज्यसभेचं कामकाजही १२:२४ पर्यंत स्थगित करण्यात आलं.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button