फोकस

पंतप्रधान मोदींची विठ्ठल चरणी प्रार्थना

नवी दिल्ली : कोरोनाच्या संकटातही आषाढी एकादशीचा उत्साह घराघरात दिसून येत आहे. देशावरील कोरोनाचं संकट लवकर जाऊ दे, पुन्हा एकदा आम्हाला गजबलेलं पंढरपूर पाहू दे… अशीच प्रार्थना लाखो वारकऱ्यांनी आज विठु-माऊलीकडे घरातूनच केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सपत्नीक पहाटे २.३० वाजता शासकीय विठ्ठल पूजा केली. त्यावेळीही, बा विठ्ठला, कोरोनाचं संकट दूर कर, अशीच प्रार्थना केली. आता, पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ट्विट करुन आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

आषाढी एकादशीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मराठीत ट्विट करुन सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. ‘आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी माझ्या सर्वांना शुभेच्छा. सर्वांना उदंड आनंद आणि चांगले आरोग्य लाभू दे अशी विठ्ठल चरणी प्रार्थना करूया. वारकरी चळवळ ही आपल्या उत्कृष्ट परंपरेचं उदाहरण असून समानता आणि एकता यावर भर देणारी आहे, असेही मोदींनी म्हटलं आहे. पंतप्रधान मोदी हे नेहमीच प्रादेशिक अस्मिता जपतात. देशातील नागरिकांना त्यांच्या भाषेत, त्यांच्या शब्दात आपुलकीने आपलसं करण्याचा त्यांच्या प्रयत्न असतो. आज आषाढी एकादशीनिमित्त पंढरीची वारी आणि वारकऱ्यांची शिकवण मोदींनी जगाला सांगितली आहे. आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी माझ्या सर्वांना शुभेच्छा. सर्वांना उदंड आनंद आणि चांगले आरोग्य लाभू दे अशी विठ्ठल चरणी प्रार्थना करूया. वारकरी चळवळ ही आपल्या उत्कृष्ट परंपरेचं उदाहरण असून समानता आणि एकता यावर भर देणारी आहे

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button