Top Newsराजकारण

पंतप्रधान मोदींकडून शरद पवारांच्या प्रकृतीची विचारपूस

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यासंदर्भात स्वत: पवार यांनी ट्विटरवरुन माहिती दिलीय. दरम्यान, पवार यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांना फोन करुन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्याबाबतची माहितीही पवार यांनी दिलीय. त्याचबरोबर पवार यांनी पंतप्रधान मोदींचे आभारही मानले आहेत.

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी फोन केला. त्यांच्या काळजीबाबत आणि शुभेच्छांबद्दल मी आभारी आहे’, असं ट्वीट शरद पवार यांनी केलं आहे.

दरम्यान, पवार यांनी दुपारी आपली कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती ट्विटरद्वारे दिली. ‘माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी उपचार घेत आहे. काळजीचे कोणतेही कारण नाही. गेल्या काही दिवसांपासून माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना विनंती की त्यांनी योग्य चाचण्या करून आवश्यक ती खबरदारी घ्यावीट, असं आवाहन पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून केलं आहे.

चंद्रकांत पाटलांची अंबाबाई चरणी प्रार्थना

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही शरद पवार यांच्या प्रकृतीसाठी अंबाबाई चरणी प्रार्थना करत असल्याचं ट्वीट केलं आहे.

‘आजोबा… काळजी घ्या’, नातू भावनिक

आजोबा… काळजी घ्या, असं आवाहन अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी केलंय. तर आमदार रोहित पवार यांनीही ट्वीट करत पवारांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.

पार्थ पवार यांनी पवारांचे ट्वीट रिट्वीट करत आजोबा… काळजी घ्या. तुम्ही लवकरात लवकर बरे व्हाल, असं ट्वीट पार्थ पवार यांनी केलंय. तर ‘आजोबा एरवी सर्वांचीच काळजी तुम्ही घेता पण आज तुमच्या कोविडच्या ट्विटने सर्वांनाच काळजी वाटू लागलीय. पण मला माहित्येय… योद्धा कधी पराभूत होत नसतो! तुम्ही लवकर बरं व्हाल! संपूर्ण महाराष्ट्राच्या सदिच्छा तुमच्या पाठीशी आहेत!’ असं भावनिक ट्वीट रोहित पवार यांनी केलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button