लस घेतल्यानंतरही प्रकाश पदुकोण यांना कोरोनाची लागण
बंगळुरू : बॉलिवूडला आणि क्रीडा विश्वालाही कोरोनाने घेरायला सुरुवात केली आहे. अनेक कलाकार, खेळाडू कोरोनाग्रस्त होत आहेत. अनेकांनी या विषाणूवर यशस्वी मातही केली आहे. कोरोनाच्या संकटामुळे आयपीएल स्पर्धाही रद्द करावी लागली. या यादीत आता आघाडीची अभिनेत्री दीपिका पदुकोण हिचे वडील आणि माजी बॅडमिंटन चॅम्पियन असलेले वडील प्रकाश पदुकोण यांची भर पडली आहे. प्रकाश पदुकोण यांना बंगळुरूच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दीपिकाची आई आणि बहीणही कोरोनाग्रस्त आहेत. पण त्यांच्यावर घरीच उपचार सुरू आहेत.
बंगळुरूच्या महावीर जैन रुग्णालयात प्रकाश पदुकोण यांना दाखल करण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांची प्रकृती सुधारत असल्याचंही या बातमीत म्हटलं आहे. प्रकाश पदुकोण यांनी त्यांच्या बॅटमिंटन कारकीर्दीत प्रतिष्ठेच्या ऑल इंग्लंड चॅम्पियनशिपमध्ये विजेतेपद मिळवलं होतं. जागतिक क्रमवारीत ते अग्रस्थानीही होते.