Top Newsफोकस

बिपिन रावत यांच्यासह हेलिकॉप्टर अपघातातील मृतांना पंतप्रधान मोदी, राजनाथ सिंहांकडून श्रद्धांजली

नवी दिल्ली : हेलिकॉप्टर अपघातात निधन झालेले देशाचे पहिले सीडीएस बिपीन रावत आणि अन्य १२ जणांचे पार्थिव आज रात्री ८ वाजता दिल्लीच्या पालम विमानतळार आणण्यात आले. यावेळी या अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांनी अंतिम दर्शन घेतले. तसेच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विमानतळावर येत अंत्यदर्शन घेतले. भारताच्या या वीरांना श्रद्धांजली अर्पण केली.

तत्पूर्वी रावत यांच्या मुलींनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. तेव्हा तिला अश्रू अनावर झाले होते. अन्य अधिकाऱ्यांचे कुटुंबीय, तसेच तिन्ही संरक्षण दलांचे प्रमुख यावेळी उपस्थित होते. एनएसए अजित डोवाल देखील आले होते.

आतापर्यंत चार जणांच्या पार्थिवाची ओळख पटली आहे. यामध्ये सीडीएस बिपीन रावत, मधुलिका रावत, ब्रिगेडिअर एलएस लिडर, लान्स नायक विवेक कुमार यांच्या मृतदेहांची ओळख पटली आहे. अन्य अधिकाऱ्यांच्या मृतदेहांची ओळख त्यांच्या कुटुबियांमार्फत पटविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button