Top Newsस्पोर्ट्स

अमेरिकेच्या विमानातून पडून तरुण फुटबॉलपटूचा अंत; धक्कादायक माहिती समोर

काबूल : तालिबानने अफगाणिस्तानची सत्ता काबीज केल्यानंतर देशात मोठ्या प्रमाणात अंधाधुंदी माजली असून, अनेक जण देश सोडून पलायन करण्याचा प्रयत्न करत आहेत. यादरम्यान, अफगाणिस्तानमधून जाणाऱ्या अमेरिकी विमानांना लटकून बाहेर जाण्याच्या प्रयत्नात खाली पडणाऱ्या लोकांचे भयावह व्हीडिओ समोर आले होते. दरम्यान, या व्हीडिओमध्ये दिसत असलेल्या तरुणाबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. अमेरिकेच्या विमानामधून खाली पडून मरण पावलेला हा तरुण प्रसिद्ध फुटबॉलपटू असल्याचे उघड झाले आहे.

अफगाणिस्तानमध्ये गोंधळ निर्माण झाल्यानंतर काबुल विमानतळावर अमेरिकेच्या सैनिकी विमानामधून खाली पडून मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये अफगाणिस्तानचा राष्ट्रीय संघातील फुटबॉलपटू झाकी अनवारी याचाही समावेश आहे. अनवारी हा काबुलमधील हामिद करझाई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून देशाबाहेर जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या हजारो अफगाणी नागरिकांपैकी एक होता. विमान उड्डाण करत असताना झाकी त्यावर चढला. मात्र अनवारी त्या विमानावरून खाली पडला. दरम्यान जनरल डायरेक्टरेटने या खेळाडूच्या मृत्यूच्या घटनेला दुजोरा दिला आहे.

याबाबत अमेरिकेच्या हवाई दलाने सांगितले की, सोमवारी सी-१७ विमान काबुलच्या विमानतळावर उतरले तेव्हा शेकडो अफगाणी नागरिकांनी या विमानाला घेराव घातला. विमानतळावर चौफेर बिघडत असलेल्या परिस्थितीचा अंदाज घेत वैमानिकांनी लवकर उड्डाण करण्याचा निर्णय घेतला. आता सोशल मीडियावर या घटनेचा व्हीडिओ व्हायरल झाला होता. त्यात विमानाने उड्डाण केल्यानंतर काही लोक खाली पडताना दिसत होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button