Top Newsराजकारण

देशाच्या सुरक्षेशी खेळ, ‘मिस्टर ५६ इंच भित्रे’; राहुल गांधींची पंतप्रधान मोदींवर टीका

नवी दिल्ली: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. मोदी सरकारकडे सुरक्षेबाबत कोणतीही रणनीती नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात येत असून, सीमेवर प्राणाची बाजी लावून सैनिक देशाचे रक्षण करत आहेत. तर सरकार खोट बोलत आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.

ट्विटरवर या संदर्भात पोस्ट करत त्यांनी लिहिले की, ‘मोदी सरकारकडे कोणतीही रणनीती नाही. आपल्या राष्ट्रीय सुरक्षेशी गुन्हेगारी खेळ केला जात आहे. ते मि. ५६ इंच घाबरले आहेत. सरकार खोट बोलत आहे. माझ्या संवेदना आपल्या जीवावर खेळून सीमेचे रक्षण करणाऱ्या सैनिकांसोबत आहेत’, अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले.

हिंदू धर्म आणि हिंदुत्व वेगळे आहे !

तत्पूर्वी, राहुल गांधी यांनी आज पक्षाच्या डिजीटल ‘जन जागरण अभियाना’चे उद्घाटन केले. या दरम्यान त्यांनी हिंदू धर्म आणि हिंदूत्व वेगवेगळ्या असल्याचं मत मांडलं. आज लोक हिंदू धर्म आणि हिंदुत्वाला एकच समजू लागले आहेत. मात्र, वास्तवात या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. तुम्ही हिंदू असाल तर तुम्हाला हिंदुत्वाची काय गरज? भाजप-आरएसएसने भारतात द्वेष पसरवला आहे. आमची विचारधारा ही प्रेम आणि बंधुभावाची आहे.

राहुल गांधी पुढे म्हणाले की, भारतात दोन विचारधारा आहेत, एक काँग्रेस पक्षाची आणि एक आरएसएसची विचारधारा. आजच्या भारतात भाजप-आरएसएसने द्वेष पसरवला आहे आणि एकता, बंधुता आणि प्रेमाची काँग्रेसची विचारधारा भाजपच्या द्वेषी विचारसरणीने झाकोळली आहे, हे मान्य करावेच लागेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button