पत्रकार म्हणून ‘ब्रेकफास्ट पे चर्चा’चं निमंत्रण मिळाल्याबरोबर त्याविषयी अधिकची चर्चा करण्यासाठी (आणि जमलं तर मेनूचा अंदाज घेण्यासाठी) आमची पावलं पप्पूसिंग दिल्लीवालेंच्या घराकडे वळली. दिवाणखान्यात आम्ही प्रवेश घेतला, तेव्हा पप्पूसिंग सोफ्यावर बसून आपल्या लाडक्या कुत्र्याशी खेळत होते. आम्ही आता घुसून त्यांना नमस्कार केला.
पप्पूसिंग – नमस्ते. बैठो.
पप्पूसिंग आमच्याकडे दुर्लक्ष करीत परत आपल्या लाडक्या कुत्र्याशी खेळू लागले.
आम्ही – (मनातल्या मनात) ऐ बाबा, मी का एमपीतून आलेलो शिंदे वाटलो की काय तुला ? माझ्याकडे दुर्लक्ष करून खुशाल त्या कुत्र्याशी खेळतोय ! (उघडपणे) सर जी, आपने ‘ब्रेकफास्ट पे चर्चा’ रखी है ?
पप्पूसिंग – ( कुत्र्याशी खेळत) – हां. हां.
आम्ही – हो , पण ‘चाय पे चर्चा’ ठेवता आली असती.एकदम ‘ ब्रेकफास्ट पे चर्चा’ कशासाठी ?
पप्पूसिंग – देखो भईया, वो चाय पे चर्चा करते है ना, फिर हम उनके आगे कदम रखेंगे. हम ब्रेकफास्ट पे चर्चा करेंगे. समजे ? और वो चाय में ये प्रॉब्लम होती है के, कोई ब्लैक टी मांगता है, कोई ग्रीन टी मांगता है, किसीको कम शक्करवाली होना, तो किसीको मीठी होना, तो कोई बिना शक्करवाली मांगता है ! कोई पिवर दूधवाली मांगता है, तो कोई कम दूधवाली मांगता है. बड़ा झंझटवाला काम होता है भईया. और हम कोई चाय के ठेलेवाले थोड़े ही ना है, के जो जैसी चाय मांगेगा वैसी बनवाकर तुरंत उसके सामने रख देंगे ?
आम्ही – (मनातल्या मनात) आयला ! याचं पूर्वी नाश्ता सेंटर होतं की काय यूपीत , जो जसा मागेल तसा नाश्ता द्यायला ? ( उघडपणे) अगदी बरोबर.
तितक्यात समोरून एक महाराष्ट्रीयन दिसणारे, चष्म्यातून डोळे वर करून बघणारे, शर्टाच्या लांब बाह्या दुमडलेले गृहस्थ आत आले आणि माझ्या शेजारी बसले.
पप्पूसिंग – आओ दाऊद.
गृहस्थ – सर , मेरा नाम दाऊद नही राउत है.
पप्पूसिंग – अरे, नाम मे क्या रखा है ? वो, महाराष्ट्रमें हमारी पार्टी के नाना है ना उन्होंने आपका वो डायलॉग बताया था फोन करके, ‘ अपने पैरोंपर आयेंगे और चार कंधोपर जायेंगे.’ तब से हमने आपका नाम दाऊद रख दिया.
गृहस्थ – (माझ्या कानाशी लागत) आयला, याला मी पप्पूसिंगच्या ऐवजी उनाडटप्पूसिंग बोललो तर ?
पप्पूसिंग – कुछ कहा आपने ?
गृहस्थ – काही नाही. हे आमच्या महाराष्ट्रातले दिसतात ना, थोडी ओळख काढत होतो.
पप्पूसिंग – अरे भईया, नाम मे कुछ नही रखा है.वो, महाराष्ट्र में हमारी पार्टी के जो नाना हैं ना उनके नाम मे दो बार ना – ना है, नाम एकदम निगेटिव, पर आदमी बड़ा पॉजिटिव है . अगला इलेक्शन अपने बलबूते पर लड़नेकी बात करता है.
गृहस्थ – (माझ्या कानाशी लागत) याला म्हणतात, ‘घर मे नही दाने और अम्मा चली पिसाने.’
पप्पूसिंग – कुछ कहा आपने ?
गृहस्थ – मी पण यांना तेच सांगत होतो. तुमचे नाना म्हणजे फुल पॉजिटिव माणूस. आमचा एक असाच पॉजिटिव मित्र आहे. त्याच्या पतपेढीचं दिवाळं निघालं आहे. तो परवा विचारात होता की, निवडणूक लढवून रिझर्व्ह बँकेचं चेअरमन होता येतं का ?
पप्पूसिंग – अरे भईया, आप क्या बोल रहे हो मुझे तो कुछ भी समझमे नही आ रहा है. ये महाराष्ट्र के इलेक्शन में रिजर्व बैंक का चेयरमैन कहा से आ गया ?
गृहस्थ – ( माझ्या कानाशी लागत) ये पॉलीटिक्स में कहा से आ गया और मैं इसके पास कहा से आ गया , ये मेरी भी समझ में नही आ रहा है.
पप्पूसिंग – कुछ कहा आपने ?
गृहस्थ – कुछ नही. आप को अभी जरा आराम की जरूरत है. आप आराम कीजिये. हम बादमें आते है.नमस्ते.