Top Newsराजकारण

एकच व्यक्ती ओरडतेय, महाराष्ट्रात भ्रष्टाचाराशिवाय दुसरं काही होत नाही; राऊतांचा सोमय्यांना टोला

नवी दिल्ली : एकच व्यक्ती भ्रष्टाचाराच्या नावाने ओरडतेय, दुसरं काही महाराष्ट्रात होत नाही. भ्रष्टाचाराच्या विरोधात सगळ्यांनी लढाई केली पाहिजे. जे लढतात त्यांच्याकडे अजून काही प्रकरण पाठवावीत असं मला वाटतं. मी हे प्रकरण ईडीकडे देईन. पिंपरी-चिंचवड महापालिकेमधील ७०० कोटी रुपयांचा हा घोटाळा आहे. या घोटाळ्याची व्याप्ती मोठी आहे. यापूर्वीच्या सरकारमधील अनेक लोकांचा सहभाग या घोटाळ्यात असल्याचा गंभीर आरोपही शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला.

आमच्या पिंपरी-चिंचवडमधील ज्या नगरसेविका आहेत सुलभा उबाळे आणि इतर नगरसेवकांनी हे प्रकरण उघडकीस आणलं आहे. त्यांच्यावर कारवाई व्हायची असेल तर ती योग्य दिशेनं व्हावी आणि योग्य माणसाकडून ज्यावं, ज्यांना भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्याची प्रेरणा आणि ऊर्जा आहे. बाकी आम्हाला माहिती आहे कुणाकडे पुरावे द्यायचे आणि काय करायचं ते, अशा शब्दात राऊत यांनी भाजपला आव्हान दिलंय.

महाविकास आघाडी सरकारमधील नेते आणि मंत्र्यांवर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आरोपांची मालिका लावली आहे. या पार्श्वभूमीवर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सोमय्या यांना एक खळबळजनक पत्र लिहिलं आहे. भाजपची सत्ता असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेत ५०० ते ७०० कोटींचा घोटाळा झाल्याचा दावा राऊतांनी केलाय. हा घोटाळाही उघड करा, असं राऊतांनी सोमय्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटलंय.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button