आरोग्यराजकारण

ओमिक्रॉनचा एकही रुग्ण नाही, लॉकडाऊनचा निर्णय नाही : टोपे

पुणे: देशात सध्या ओमिक्रॉनचा एकही रुग्ण सापडला नाही. हा आजार अतिशय धोकादायक असल्याचं कुठेही सिद्ध झालेलं नाही. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन करण्याचा कोणताही विचार नाही, असं सांगतानाच येत्या १ डिसेंबरपासून शाळा सुरू होणार आहेत आणि उद्योगही सुरूच राहणार आहेत, असं राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.

राजेश टोपे यांनी माध्यमांशी संवाद साधताना ही माहिती दिली. आपल्या देशात ओमिक्रॉनचा एकही रुग्ण सापडला नाही. हा आजार अत्यंत धोकादायक आहे हे सिद्धही झालं नाही. मी अभ्यास करून माहिती देत आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. कोणत्याही दहशतीखाली राहू नये. ओमिक्रॉनचा रुग्ण सापडला नसल्याने सध्या ज्या गोष्टी अनलॉक आहेत, त्यात कोणताही बदल केला जाणार नाही. जे उद्योगधंदे सुरू आहेत. ते तसेच सुरू राहितील. त्यात काही बदल केला जाणार नाही. शिवाय येत्या १ डिसेंबरपासून राज्यातील शाळा सुरू होणार आहे. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याशी माझं याबाबत बोलणंही झालं आहे, असं टोपे यांनी सांगतिलं.

संभाव्य धोक्यापासून वाचायचं असेल तर आज काय करावं तर कोविडचे नियम पाळले पाहिजेत. अजून काही प्रोटोकॉल असतील तर जागतिक आरोग्य संघटना त्याबाबतचे निर्देश देईल. त्याची अंमलबजावणी केली जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button