Top Newsराजकारण

आता पंजाबमध्ये भाजपसोबत निवडणूक लढणार; कृषी कायदे मागे घेतल्यानंतर अमरिंदर सिंगांची घोषणा

चंदिगढ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीनही कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केल्यानंतर, पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आनंद व्यक्त केला आहे. भाजपसोबत जागावाटप करून विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. कृषीविषयक कायदे रद्द होताच आणि शेतकऱ्यांचे आंदोलन संपताच भाजपसोबत निवडणूक लढवणार असल्याचे कॅप्टन सिंग यांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते. महत्वाचे म्हणजे, आता साडेतीन महिन्यांनी राज्यात होणारी विधानसभा निवडणुका कॅप्टन भाजपसोबत लढवणार असल्याचेही निश्चित झाले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकले आणि त्याची समस्या समजून घेत कृषी कायदे रद्द केले. एवढेच नाही, तर मी हा मुद्दा सातत्याने उचलला आणि सरकारला भेटत राहिलो, असे कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी म्हटले आहे. मोदींच्या घोषणेनंतर कॅप्टन अमरिंदर सिंग म्हणाले, आज पंजाबमध्ये आमच्यासाठी मोठा दिवस आहे. मी हा मुद्दा एक वर्षाहून अधिक काळापासून उचलून धरला होता. यासंदर्भात, मी अनेक वेळा पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यांना अन्नदात्या शेतकऱ्यांचा आवाज ऐकण्याची विनंती करत राहिले. त्यांनी शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकले आणि आमच्या समस्या समजून घेतल्या याचा खूप आनंद आहे.

कॅप्टन म्हणाले, हा शेतकर्‍यांसाठी तर मोठा दिलासा आहेच, पण पंजाबच्या प्रगतीचा मार्गही खुला झाला आहे. आता आपण भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारसोबत शेतकऱ्यांच्या विकासासाठी काम करणार आहोत. पंजाबमधील प्रत्येक व्यक्तीच्या डोळ्यातील अश्रू पुसल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत, असे आश्वासनही अमरिंदर सिंग यांनी पंजाबच्या शेतकर्‍यांना दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button