Top Newsस्पोर्ट्स

न्यूझीलंडचा पहिला डाव ६२ धावांवर गडगडला; भारताला ३३२ धावांची आघाडी

एजाझ पटेलच्या ऐतिहासिक कामगिरीनंतरही भारतीय संघाचे सामन्यावर वर्चस्व

मुंबई : विराट कोहलीच्या पुनरागमनानं टीम इंडियाच्या ताफ्यात आक्रमकता आली. गोलंदाजांचे मनोबल उंचावताना प्रतिस्पर्धी फलंदाजांना डिवचणारा विराट पुन्हा मैदानावर पाहून चाहतेही आनंदात दिसले. एजाझ पटेलनं टीम इंडियाच्या सर्व शिलेदारांना तंबूत पाठवल्यानंतर विराटनं भारतीय गोलंदाजांचा उत्साह वाढवला अन् किवींचा पहिला डाव २८.१ षटकांत गडगडला. भारताच्या पहिल्या डावातील ३२५ धावांच्या प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा पहिला डाव केवळ ६२ धावांवर गडगडला. आज दिवसभर भारताच्या ६ व न्यूझीलंडच्या १० अशा १६ विकेट्स पडल्या आणि त्यापैकी १३ विकेट्स या फिरकीपटूंनी घेतल्या. भारतानं दुसऱ्या दिवसअखेर ३३२ धावांची आघाडी घेतली आहे.

४ बाद २२१ वरून भारतानं आज डावाची सुरूवात केली. परंतु दुसऱ्या दिवसाच्या पहिल्याच षटकात एजाझनं सहाला ( २७) पायचीत केलं अन् पुढच्याच चेंडूवर आर अश्विनला त्रिफळाचीत केलं. अक्षर व मयांक यांनी सातव्या विकेटसाठी दमदार खेळ केला. मयांक ३११ चेंडूंत १७ चौकार व ४ षटकारांसह १५० धावांवर एजाझच्या गोलंदाजीवर माघारी परतला. अक्षरनं ११३ चेंडूंत कसोटीतील पहिले अर्धशतक पूर्ण केले. पण, एजाझनं पुन्हा खोडा घातला, अक्षरला ५२ धावांवर पायचीत केले. त्यानंतर जयंत यादव व मोहम्मद सिराज यांची विकेट घेत एजाझनं इतिहास रचला. भारताचा पहिला डाव ३२५ धावांवर गुंडाळला. एजाझनं ४७.५ षटकांत ११९ धावांत १० विकेट्स घेतल्या. त्यानं १२ निर्धाव षटकंही फेकली.

केन विलियम्सनची उणीव न्यूझीलंडला प्रकर्षानं जाणवली. इशांत शर्माच्या जागी संघात स्थान पटकावलेल्या मोहम्मद सिराजनं पहिल्या स्पेलमध्ये ४ षटकांत १९ धावा देताना तीन विकेट्स घेतल्या. विल यंग, टॉम लॅथम व रॉस टेलर हे आघाडीचे फलंदाज माघारी पाठवून सिराजनं टीम इंडियासाठी विजयाचे दार उघडले. त्यानंतर भारतीय फिरकीपटूंनी कमाल केली. अक्षर पटेल व जयंत यादव धक्के देतच होते, परंतु अनुभव आर अश्विननं किवी फलंदाजांना गुंडाळले. किवींचा पहिला डाव ६२ धावांवर गडगडला. आशियाई देशाविरुद्ध किवींची ही निचांक कामगिरी ठरली. भारतानं पहिल्या डावात २६३ धावांची आघाडी घेतली. आर अश्विननं ८ धावा देताना ४ विकेट्स घेतल्या. मोहम्मद सिराजनं १९ धावांत ३, तर अक्षर पटेलनं १४ धावांत २ बळी टिपले. जयंत यादवनं एक विकेट घेतली.

आर अश्विननं न्यूझीलंडविरुद्ध कसोटीत भारतीय गोलंदाज म्हणून सर्वाधिक ६२ विकेट्स घेतल्या आहेत. त्यानंतर बिशन सिंग बेदी ( ५७), इरापल्ली प्रसन्ना ( ५५), अनिल कुंबळे ( ५०) व जहीर खान ( ४७) यांचा क्रमांक येतो. दरम्यान, क्षेत्ररक्षण करताना शुभमन गिल याच्या बोटाला चेंडू लागल्यानं चेतेश्वर पुजारा व मयांक अग्रवाल ही जोडी सलामीला आली आहे. या दोघांनी दुसऱ्या दिवसाचे अखेरचे सत्र सहज खेळून काढताना बिनबाद ६९ धावा केल्या. भारतानं दुसऱ्या दिवसअखेर ३३२ धावांची आघाडी घेतली आहे.

दुसऱ्या कसोटीचा दुसरा दिवस हा गोलंदाजांनी गाजवला. एजाझ पटेलनं यानं १० विकेट्स घेत विश्वविक्रमाची नोंद केली आणि भारताला पहिल्या डावात ३२५ धावांवर समाधान मानावे लागले. मयांक अग्रवालनंचे दीडशतक व अक्षर पटेलच्या अर्धशतकांनी भारताचा डाव सावरला. मुंबईच्या खेळपट्टीवर एजाझचा करिष्मा चालला तिथे भारतीय गोलंदाज चमकणार नाही, असे कसं होईल. मोहम्मद सिराजनं सुरुवातीला जबरदस्त धक्के दिले आणि नंतर फिरकीपटू त्याला जॉईन झाले. आर अश्विननं चार विकेट्स घेत किवींचा पहिला डाव सहज गुंडाळला. टीम इंडियानं फॉलोऑन न देता पुन्हा फलंदाजीचा निर्णय घेतला.

इशांत शर्माच्या जागी संघात स्थान पटकावलेल्या मोहम्मद सिराजनं पहिल्या स्पेलमध्ये ४ षटकांत १९ धावा देताना तीन विकेट्स घेतल्या. विल यंग, टॉम लॅथम व रॉस टेलर हे आघाडीचे फलंदाज माघारी पाठवून सिराजनं टीम इंडियासाठी विजयाचे दार उघडले. त्यानंतर भारतीय फिरकीपटूंनी कमाल केली. अक्षर पटेल व जयंत यादव धक्के देतच होते, परंतु अनुभव आर अश्विननं किवी फलंदाजांना गुंडाळले. किवींचा निम्मा संघ ३१ धावांवर माघारी परतला होता. त्यात अश्विनच्या दणक्यानं त्यांची अवस्था आणखी बिकट केली. फॉलोऑन टाळण्याची किवी फलंदाजांची धडपड पाहायला मिळाली. अश्विननं चार विकेट्स घेतल्या. किवींचा पहिला डाव ६२ धावांवर गडगडला. आशियाई देशाविरुद्ध किवींची ही निचांक कामगिरी ठरली. भारतानं पहिल्या डावात २६३ धावांची आघाडी घेतली.

आर अश्विननं ८ धावा देताना ४ विकेट्स घेतल्या. मोहम्मद सिराजनं १९ धावांत ३, तर अक्षर पटेलनं १४ धावांत २ बळी टिपले. जयंत यादवनं एक विकेट घेतली.

फॉलो ऑन न देण्याचा विराट कोहलीचा निर्णय

टीम इंडियाला पाहुण्यांना फॉलोऑन देण्याची संधी होती, परंतु टीम इंडियानं पुन्हा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गोलंदाजांना साथ देणाऱ्या खेळपट्टीवर असा निर्णय घेणे, महागात पडू शकते. परंतु त्यामागे तसंच कारणही आहे. या मालिकेनंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. १७ डिसेंबरपासून सुरू होणारा आफ्रिका दौरा आता २६ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. त्यामुळे भारतीय फलंदाजांना आव्हानात्मक परिस्थितीत फलंदाजीचा सराव मिळावा यासाठी कर्णधार विराट कोहलीनं पुन्हा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button