Member of Parliament Praful Patel met Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan, Mumbai. This was a courtesy call and lasted for about 1 hour. pic.twitter.com/h7jmfB1dZ3
— Governor of Maharashtra (@maha_governor) May 10, 2021
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी आज (१० मे) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली. ही भेट सुमारे एक तास चालली. या भेटीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेला उधाण आले आहे. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे या देखील राज्यपालांच्या भेटीसाठी गेल्या होत्या. त्यानंतर आता प्रफुल्ल पटेल यांनी भेट घेतल्यानं तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
राज्यपालांच्या या भेटीबद्दल स्वतः प्रफुल्ल पटेल यांच्याकडून अद्याप कोणतंही ट्विट करण्यात आलेलं नाही, मात्र राज्यपाल कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हँडलवर या भेटीची माहिती देण्यात आली. तसेच जवळपास १ तास चर्चा झाल्याचंही नमूद करण्यात आलं. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली होती.